राज्य मंत्री कामगार मा.ना. आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठकीस कामगार नेते भाई गौतम आगळे रवाना
परळी ( प्रतिनिधी ) मा.ना. राज्यमंत्री कामगार आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई मंगळवार दिनांक २ जून २०२६ रोजी दुपारी २: ३० वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील बैठकीस कामगार नेते तथा संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर मुंबईस रवाना झाले आहेत,अशी माहिती रोजंदारी मजदुर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर कामगार राज्यमंत्री मा.ना.आशिष जयस्वाल मंत्री महोदयांचे समिती कक्ष ३१९ विस्तार, मंत्रालय मुंबई, यांच्या अध्यक्षतेखाली कामगार विभागाने आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. सदरील बैठकीस प्रधान सचिव कामगार विभाग, प्रधान सचिव ऊर्जा विभाग, कामगार आयुक्त तसेच स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार कृती समिती चे सल्लागार व संयोजक
कॉम्रेड नचिकित मोरे
संघटना, अध्यक्ष वामन बुटले ,उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर, तथा रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव. यांच्यासह राज्यातील कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, पारस, भुसावळ, नाशिक व मराठवाड्यातील एकमेव परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगार प्रतिनिधीचीं संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
Comments
Post a Comment