व्यापाऱ्यावर 60 टक्के भाडेवाढ व पन्नास हजार ना परतावा डिपॉझिट सह विविध प्रलंबित मागण्यांसाठी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांचा उपोषणाचा इशारा

व्यापाऱ्यावर 60 टक्के भाडेवाढ व पन्नास हजार ना परतावा डिपॉझिट सह विविध प्रलंबित मागण्यांसाठी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांचा उपोषणाचा इशारा

२९ जून रोजी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण; २५ जूनपर्यंत मागण्या मान्य करण्याची प्रशासनाला मुदत
परळी वैजनाथ | प्रतिनिधी

परळी नगर परिषदेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुखौ यांनी २९ जून २०२६ रोजी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी, नगर परिषद परळी यांना देण्यात आले असून २५ जूनपर्यंत मागण्या मान्य करून लेखी कळविण्याची मागणी करण्यात आली आहे.
 निवेदन देण्यापूर्वी तब्बल परळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या सोबत पाच तास प्रदीर्घ सर्व विषयावर चर्चा करण्यात आली आहे.

देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात परळी शहरातील व्यापारी, पत्रकार, बौद्ध समाज, कंत्राटी कामगार तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांशी संबंधित सात महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. नगर परिषदेकडून व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेली भाडेवाढ व अनामत रक्कम रद्द करावी, पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी मंजूर जागा पत्रकारांनाच देण्यात यावी, मराठा भवनासाठी दिलेल्या जागेबाबत स्पष्ट माहिती द्यावी, भीमनगर येथील प्रलंबित बुद्ध विहाराचे काम तातडीने सुरू करावे, छत्रपती संभाजी चौकाचे सुशोभीकरण करावे, सरस्वती नदीवरील अतिक्रमणे हटवून संबंधित कामांची चौकशी करावी तसेच स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने अदा करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनात देशमुख यांनी नमूद केले आहे की, यापूर्वी अनेक वेळा निवेदने व विनंत्या करूनही नगर परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. प्रशासनाने २५ जूनपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी परळी, तहसीलदार परळी तसेच शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे परळी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून नगर परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी