Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

धोकादायक विद्युत रोहित्राला कपड्याने झाकण्याची प्रशासनावर नामुष्की ; सोमवारी "सेल्फी विथ रोहित्र हॅशटॅग अजितदादा" लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड :- (दि.१८ )मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या बीड दौऱ्या दरम्यान नगरनाका ते कृषी कॉलनी मार्गावरील एसबीआय बँकेजवळ असलेल्या धोकादायक विद्युत रोहित्राला कपड्याने झाकून ठेवण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या मधोमध असणारे हे रोहित्र व विजेचे खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत असून अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते व मुख्य प्रचार प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड जिल्हा डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी याविरोधात वारंवार निवेदने व आंदोलन केले तरी महावितरण व नगरपरिषद प्रशासन जबाबदारी झटकत आहेत. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात प्रशासनाने रोहित्र झाकून ठेवून प्रश्न झाकण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. नगरनाका ते कृषी कॉलनी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून येथे नाट्यगृह, दवाखाने, शाळा, शिकवण्या असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा गर्दीच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध उघडे रोहित्र व लोंबकळणाऱ्...

कुत्र्यांच्या हल्ल्यातून हरणाची सुटका गणेश खाडे फौजीच्या धाडसी उपक्रमाचे गावकर्याकडून कौतुक

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) आजच्या धावपळीच्या जगात माणूस स्वतःपुरता विचार करत असताना, करंजवण येथील गणेश खाडे फौजी व त्यांच्या मित्रांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. करंजवण मार्गावर चार-पाच कुत्र्यांनी हरणावर हल्ला केला होता. जखमी हरणाचे तडफडणे पाहताच गणेश खाडे फौजी व सोबत्यांनी कोणतीही पर्वा न करता तत्काळ धाव घेतली. बाबासाहेब नागरगोजे, तानाजी खाडे,विशाल खाडे, अमोल सानप, सुमित सानप व केशव खाडे या तरुणांनी मिळून कुत्र्यांना पळवून लावले. त्यानंतर हरणाला सुरक्षित स्थळी नेऊन वनविभागाचे पवार यांच्याकडे सुपूर्द केले.या घटनेतून समाजात संदेश जात आहे की फक्त माणूस नव्हे तर प्रत्येक जीवाचा जीव महत्त्वाचा आहे. करंजवण परिसरात या घटनेची सर्वत्र चर्चा असून, गावकऱ्यांनी या तरुणांच्या कार्याचे भरभरून कौतुक होत असुन प्रत्येक जीवाचे प्राण वाचवणे हीच खरी माणुसकी हा संदेश गणेश खाडे फौजी यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी ‘तार कुंपण योजना’चा लाभ घ्यावा – भाऊसाहेब भवर, अनिल कातवटे, किशोर नागरगोजे यांचे आवाहन

Image
पाटोदा (प्रतिनिधी )शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्यप्राण्यांपासून व चोरीपासून संरक्षण करण्यासाठी शासनाने राबविलेली शेतासाठी तार कुंपण योजना ही अत्यंत उपयुक्त योजना असून पाटोदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंमळनेर जिल्हा परिषद गटाचेनेते भाऊसाहेब भवर,अनिल कातवटे व किशोर नागरगोजे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल ९० टक्के अनुदान मिळणार असून त्यामुळे शेतांचे संरक्षण, उत्पादनवाढ व आर्थिक बोजा कमी होणार आहे. या योजनेचे फायदे पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण,शेतातील नुकसान कमी होऊन उत्पादन वाढ, पिकांचे चोरी व इतर नुकसान टळणार यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे शेतकरी ओळख क्रमांक,आधार कार्ड इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या श्रेयश डिजिटल पंचायत समिती कॉम्प्लेक्स पाटोदा यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन अमळनेर जिल्हा परिषद गटाचेनेते भाऊसाहेब आण्णा भावर,अनिल कातवटे, किशोर नागरगोजे यांनी केले आहे.

लिंबागणेश प्रा. आ. केंद्राची अवस्था बिकट – ५ लक्ष रुपये खर्चूनही छत कोसळले, झालेल्या कामाची चौकशी व्हावी ग्रामस्थांची मागणी

Image
.  लिंबागणेश :- (दि.१८) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर गतवर्षीच ५ लक्ष रुपयांचा निधी खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. तरीदेखील इमारतीची अवस्था पूर्ववतच राहिल्याने अखेर दि. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसात आरोग्य केंद्राच्या छताचा भाग कोसळला.सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. गतवर्षीच जिल्हा वार्षिक निधी २०२३-२४ मधून आरोग्य केंद्राच्या इमारतीसह इतर कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, गुत्तेदाराने थातुरमातुर काम केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे निधीचा अपव्यय झाला असून कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी (१९ ऑगस्ट २०२४)च बाळंतीण सुनिता बोरखडे, रा. बोरखेड यांना पावसामुळे झालेल्या गळतीमुळे त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळीच पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी रुग्णांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ दुरुस्तीचे आदेश देऊन निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. मात्...

कंत्राटी कामगारांच्या न्याय व हक्कासाठी रोमसेचे अन्नत्याग उपोषण-भाई गौतम आगळे

Image
बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील कार्यरत घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगार व परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व कंत्राटी कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ०८:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर कंत्राटी कामगार प्रतिनिधी तथा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.        या बाबत सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्त कंत्राटदार व मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथील सर्व विभाग प्रमुखांच्या अधिनस्त असलेले कंत्राटदार यांनी कंत्राटी कामगार ( नियमन व निर्मूलन ) अधिनियम 1970 आणि किमान वेतन अधिनियम 1948 च्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच महानिर्मिती प्रकाश गड बांद्रा पुर्व मुंबई व्यवस्थापनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाची सुद्धा काटेकोर...

थेरला शिवारात दरोडा – मिसाळ कुटुंबावर चोरट्यांचा जीवघेणा हल्ला! परिसरात भीतीचे वातावरण

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) : पाटोदा तालुक्यातील थेरला शिवारात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाड टाकून भीमराव मिसाळ व त्यांची पत्नी सत्यभामा भीमराव मिसाळ यांच्या घरावर दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी घरातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत लोखंडी रॉडसह जबर मारहाण केली. या घटनेत भीमराव मिसाळ गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरट्यांनी घरातील रोकड, दागिने लंपास केले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. मध्यरात्री झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे थेरला शिवार आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परळी शहरातील मुख्य रस्त्यावर तिरुपती मंदिर धरतीवर पदचारी फुटपाथ करा-मा. नगराध्यक्ष दिपक देशमुख

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ):- परळी शहराचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनात शहरातील मुख्य रस्त्यावर तिरुपती मंदिर धरतीवर पदचारी फुटपाथ करा अशी मागणी केली आहे. परळी शहरातील रेल्वे स्टेशन व बस स्थानक रोड पासून हाडबे रोड, नेहरु चौक (तळ) ते वैद्यनाथ मंदिर पर्यंत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पदचारी अच्छादन (फुटपाथ शेड) तिरुपती मंदिर धरतीवर करणे बाबत निवेदन देण्यात आले निवेदनात पुढे नमूद केले आहे. कि, परळी शहर तीर्थ विकास या मध्ये समाविष्ट असल्याने त्या बजेट मध्ये रेल्वे स्टेशन व बस स्थानक मार्गे हाडबे रोड, नेहरु चौक (तळ) ते वैद्यनाथ मंदिर पर्यंत पायी येणाऱ्या भाविकांसाठी पदचारी (फुटपाथ) वर उन्ह. पाऊसा पासून स्वरक्षण मिळण्यासाठी तिरुपती मंदिर धरतीवर भाविकांसाठी पदचारी मार्गे आच्छादित करुन रोड वरील भाविकांचा त्रास कमी होईल व रोड वरील वाहनांना सुद्या भाविकांचा त्रास होणार नाही. तरी वैद्यनाथ मंदिरला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही. तरी या वर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.