गेवराई तालुक्यात पुरवठा विभागाची धडक कार्यवाही एकूण १२ सिलेडर केले जप्त

सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी

जागतिक युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय तसेय तालुकास्तरीय पथक गठीत करण्यात आलेले होते .
त्यानुसार गेवराई तालुक्यात बीड बायपास ते जालना बायपास परिसर व शहरातील इतर भागात अचानक तपासणी केली असता . एकूण १२ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत .
वरीते कार्यवाही माननीय श्री . शिवकुमार स्वामी जिल्हा पुरवठा अधिकारी बीड .
श्री संदीप खोमणे तहसीलदार गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे असे श्री नायब तहसिलदार गजानन मोरे यांनी सांगितले . सदर कार्यवाहीत श्रीकृष्णा मिसाळ . सचिन जाधव . मनोज पवार . सुधीर जोशी . गजानन वादे हे उपस्थितीत होते .
तसेच यापुढे देखील सदर मोहीम सुरूच राहील त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना घरगुती गॅसचा वापर न करता पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पुरवठा विभागाने आवाहन केले आहे असेही श्री गजानन मोरे नायब तहसिलदार यांनी आमच्या प्रतिनिधी शी चर्चा करताना आसे सांगितले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी