माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर 420 चा गुन्हा; केजमध्ये खळबळ
माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर '420’ चा गुन्हा; केजमध्ये खळबळ
“सत्य परेशान हो सकता है,लेकीन पराजित नही ” – अनिल तुरूकमारे
तात्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे वरही लवकरच होणार कार्यवाही?
केज (जि. बीड) : लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी प्रकरणात मोठी कारवाई करत केज पोलीस ठाण्यात माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे व तत्कालीन लिपिक राजकुमार वाव्हळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा (IPC 420) व (IPC 34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरूकमारे (रा. बीड) यांनी तक्रार दिली असून, त्यांच्या मुलासह 464 विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रे माहिती अधिकारातून मिळवून, त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सूत गिरणीच्या सभासद यादीत नावे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सन 2017 ते 2020 या कालावधीत तब्बल 464 अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला. सूत गिरणीच्या रेकॉर्डवर संबंधितांना परस्पर सभासद दाखवून ती यादी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालयाकडून प्रमाणित करून घेतल्याचे समोर आले आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी संबंधित कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर सूत गिरणी प्रशासनाने संबंधित यादी रद्द केल्याचेही समजते. मात्र, यामागील संगनमत व फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिल तुरूकमारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सत्य परेशान हो सकता है, पण कधीही पराजित होत नाही. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक समाज कल्यान आयुक्त बीड रवींद्र शिंदे व इतरांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केज पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment