दादर रेल्वे स्थानकाचे नांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करामागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे अंबाजोगाईत धरणे आंदोलन
दादर रेल्वे स्थानकाचे नांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करा
मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे अंबाजोगाईत धरणे आंदोलन
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
दादर रेल्वे स्थानकाचे नांव बदलून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करण्यात यावे या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे युवा मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे यांच्या नेतृत्वात मंगळवारी अंबाजोगाईतील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी, बीड यांना उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या लोकजनशक्ती पार्टी महाराष्ट्राच्या वतीने १७ मार्च २०२६ पासून महाराष्ट्रभर आपल्या सर्वांचेच आदरणीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राज्यघटनाकार बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नांव देण्यात यावे. अशा प्रकारची मागणी घेऊन महाराष्ट्रभर लोकजनशक्ती पक्षाच्या वतीने जन आंदोलन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन आम्ही सर्व कार्यकर्ते करीत आहोत. शासनाने आमच्या या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी आणि आमच्या अस्मितेचा, विचाराचा हा विषय असल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री तातडीने दादर रेल्वे स्टेशनचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर स्टेशन असे करावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. आमच्या या मागणीच्या अनुषंगाने शासनाने तातडीने जर अंमलबजावणी केली नाही. तर सदरचे आंदोलन हे राज्यव्यापी व देशव्यापी सुद्धा होऊ शकेल. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जर शासनाने दखल घेऊन दादर रेल्वे स्टेशनचे नांव बदलले तर आम्ही सरकारचे आनंदाने स्वागत करू अन्यथा आम्हांला यापुढे जोपर्यंत नामांतर होणार नाही. तोपर्यंत हे आंदोलन महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर करावे लागेल. याची दखल शासनाने घ्यावी असे निवेदक लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे युवा मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे यांनी निवेदनात म्हटले आहे. सदरील धरणे आंदोलनात लोकजनशक्ती पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक काळे, नाना सरवदे, लखन कांबळे, अभिषेख तरकसे, महेंद्र शेवाळे, करण तेलंग, अझर सय्यद, आदित्य चौरे, भैय्या केरकर, किरण घुमरे, विशाल शेवाळे, दयानंद कांबळे, अजहर, शेख फेरोज, कैलास मस्के यांच्यासह आंबेडकर प्रेमी नागरिक व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. तर धरणे आंदोलन स्थळी केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.बब्रुवाहन पोटभरे, भिमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब, रिपाइंचे दीपक कांबळे, तानबा लांडगे, युवा आंदोलनचे अशोक पालके, जीवनराव घाडगे, सुधाकर जोगदंड, वसंतराव उदार आदींसह मान्यवरांनी भेट दिली.
Comments
Post a Comment