वाढदिवसानिमित्त जगलेल्या आयुष्याचे चिंतन हेच खरे अभिष्टचिंतन- डॉ जितीन वंजारे
सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितीन वंजारे यांच्या फेसबुक वालवरून
वाढदिवसानिमित्त जगलेल्या आयुष्याचे चिंतन हेच खरे अभिष्टचिंतन- डॉ जितीन वंजारे
संघर्षमय आयुष्यात जेही मानस सोबत भेटली मित्र,शत्रू जलकट, मळकट,प्रेमळ, गेमर,साधी, भोळी, चतुर, कपटी,स्वार्थी, निस्वार्थी,गद्दार, खुद्दार,सखा, मित्र,जवळचा परका, सक्खा सावत्र, चुलत, निलत, शेजारी, पाजारी, सुसंस्कृत,सज्यन,बेवडा,डॉन,गरीब, श्रीमंत,दर्दीवाला, वर्दीवाला, आम, खास, आदरणीय, माननीय,क्लासमेंट, रूममेट,जेलमेट,आधारू, उधारू, मदतगार, फुकट्या, सोंगाड्या, खादाड, पियक्कड , दगड, पत्थर दिलवाला, सेंटीमेंट,आवारा,असिक, रसिक, वक्ता, प्रवक्ता,शिकलेला, अडाणी, नशेडी, गंजेडी, स्मोकर, गुन्हेगार, आंदोलनजीवी, सहिष्णू, धार्मिक, आधार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक भौतिक, सल्लागार, तज्ज्ञ, गाढवं,ढ, हुशार,आस्तिक नास्तिक, डाव्या किंवा उजव्या विचारसरणी चा,सच्चा किंवा लफंगा,गायक, वादक, लेखक,नेता अभिनेता, भिकारी, गर्भश्रीमंत, जिगरी, फुगीर, सामान्य, असामान्य, काळा, गोरा, उच्च, नीच,हर एक वर्गातला माझा मित्र मी जपला ज्याला जे हवंय त्यासोबत काही काळ का होईना मैत्री जपली त्याची परिस्थिती समजून घेतली आणि आज प्रत्येक क्षेत्रातला माझा मित्र माझा मार्गदर्शक उभा तयार आहे आणि म्हणून मी इथपर्यंत पोहचलो नसता मागेच हारळी उगल्या असत्या हेही तितकंच खरंय.....!
आज वयाची 37 वर्ष पूर्ण केलीत अगदी स्वाभिमानाने ताठ मानेने समाजात वावरत आहे कारण नियतीने जगलो, स्वाभिमानाने तयार केलेलं साम्राज्य दीर्घाकाळ टिकतं. ओरबाडून,लुटून, लोकांचं घेतलेलं वापस न देता , बुडवून तळतळाटाच कडेला जातं नाही. निसर्ग नियमाने नियतीने सत्याने आणि विश्वासने संघर्षातून उभा राहिलेल साम्राज्य हे 24 कॅरेट सोन्या सारख निपुण सर्वगुण संपन्न असत. माझ्या आयुष्यात अनुभव नसलेले क्षेत्र किंवा मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभवलं नाही असं कदाचितच क्षेत्र असेल. बाकी आजही यमाचा आदेश आला तरी थाटात सोबत जायची तयारी असलेला हाच तो 'संघर्षपुत्र जितेंद्र' आहे बरका. त्यामुळे आपली कश्यातही तयारी आहे.जगायचं ते जगलोय, वागायचं ते चांगलंच सत्याच्या बाजूने वागलोय,मान, सन्मान,अपमान, हार, जित, जय, पराजय सगळंच अनुभवलय, ऊन पाऊस अन थंडी वारा सगळंच गिळलंय आता सगळं अगदी रेषेत आहे.भय,भूक,प्रेम, माया,संभोग,निद्रा, भोग, कर्म, मोक्ष, प्रारब्ध,अन समाधी यासाठी लागणार रोटी, कपडा, मकान, शिक्षण, सामाजिक स्थान, मान, सन्मान,धर्म, वंश, अन देशहीत सगळंच जपतो आहे.त्यातून सर्वोतोपरी 'पुरुषार्थ' जपला आहे.आई वडील, भाऊ, बहीण,धर्मपत्नी, पुत्र, पुत्री, स्वजन,नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट,इष्टदेव कुलदैवत, ग्राम दैवत, मनुष्यजीव, प्राणीमात्र यावर प्रेम, माया,दया, क्षमा, याचना, शांती करून सत्कर्म साधला आहे.कोणी म्हणेल असं वागलं पाहिजे तस वागल पाहीजे त्याचा तोंड बंद करा कारण प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे,या दर्दभऱ्या दुनियेतील हर एक माणूस वेगळा आहे, त्यामुळे एकच मापदंड सर्वाना कसा शक्य आहे? सगळंच वेगवेगळ आहे आणि म्हणून स्वछंदी जगा, मनमर्जी आपल्या आयुष्यात असू द्या.जगताना मात्र खरेपणा, सत्यता नियती अन निसर्गनियम जपा. जग आपल्यात पहा स्वतःला त्या जागेवर ठेवा, मदत जपून करा करणं मदतीच्या लायक परतफेडी करणारे खूप थोडे लोक आहेत कारण लबाडाच्या खोटारड्या विश्वासघातकी जगात दयाळू, दानशूर, विश्वासू राजा हरिश्चंद्र टिकत नसतो अन कलियुगात जगताना सतयुगाचा राम अन कृष्ण होऊन चालणार नाही, कृष्णाने सांगितल्या प्रमाणे इथे रनभूमीत सगळं माफ असत.सगा सोयरा इथे गणला जाणार नाही युद्धात विरोध असतोच समोरचा कौरव जरी तुझा भाऊ बंध असला तरी ही युद्धभूमी आहे इथे त्याने मारण्याच्या आत तु बाण नाही मारला तर त्याचा बाण लागून तु मारला जाशील आणि म्हणून उठ घे बाण अन मार त्यांना असा आदेश दस्तरखुद्द श्रीकृष्नाचा चा आहे. ज्याने प्रेम म्हणजे काय या जगाला सांगितलं. आणि म्हणून 'सज्यनाशी राहावे सज्ज्यन दुर्जानाशी दुर्गुनी' जैसा देश वैसा भेस असच राहावं लागणार आहे. झालं गेलं विसरा प्रत्येक दिवस नवीन आहे. पुन्हा नव्याने सुरुवात करा. नवा संसार उभा करा. मेलेले गेलेले अन हरवलेले कालवश असलेले कायमचे सोडा नवीन स्थान, नवीन विचार, नवीन व्यवहार,नवीन धन अन नवीन विश्व तयार करा. जुन्यातच गुरफटून राहू नका. जग उगवत्या सूर्याला सलाम करत मावळत्याला नाही आणि म्हणून अपडेटेड रहा नवनवीन कल्पना नवनवीन व्यवहार आर्थिक, भौतिक,सामाजिक अन जागतिक ज्ञान घ्या. कायम काहीतरी करत रहा. काहीच नाही झालं तर शांत झोप तरी घ्या. शांत झोपेतून जागून दुसऱ्या दिवशी इतिहास करा.नावलौकिक असच भेटत नाही भावा त्याला देह चंदनापरी झिजावा लागतो. अपार कष्ट सच्चा लगण, सातत्य आणि मेहनत घ्यावी लागते तेंव्हा कुठं यश मिळत. त्याला खूप वर्षाचा संघर्ष लागतो एकच दिवसात तात्काळ लाभलेली श्रीमंती लगेच गायब होते पण अनेक काळाचा संघर्ष कायम टिकतो आणि म्हणून भिकेत मिळालेली फुकटची बापाची, सासऱ्याची किंवा बुडीताची संपत्ती कायम त्रास देते.आणि म्हणून मेहनतीच खा. जो माणूस दुसऱ्याच घेतलेलं कर्ज बुडवतो त्याच्या वंशात कायम धनसंपदा पाठ फिरवते त्याला पूर्वज्यांचे थकबाकी चें बुडवाबुडवी चें पापीकुकर्म लाभते अन त्यांची गरिबी हटत नाही आणि म्हणून मिळवलेल्या संपत्तीतून दान अवश्य करायला पाहीजे, आपल्यापेक्षा गरिबांना फुल ना फुलांची पाकळी दान करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही.
आज माझा 37 वा वाढदिवस आज मी 38 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सामाजिक कार्य, आरोग्य सेवा, रंजल्या गांजल्यांची सेवा, देशसेवा,राष्ट्रहीत, प्रज्ञा शील करुनेने संपन्न त्रिसरण,पंचशील,अष्टांग मार्ग,अन महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा समोर ठेऊन मानवता कायम अबाधित ठेऊ.जयभिम, नमोबुध्दाय,जय मानवता, जय भारत.
आपलाच सामाजिक कार्यकर्ते मा सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030
Comments
Post a Comment