समाजसेविका सौ अंजली जाधव यांना महाराष्ट्र नायक पुरस्कार जाहीर
सखाराम पोहीकर गेवराई तालुका प्रतिनिधी
घाटकोपर येथील सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन अंजली प्रवीण जाधव यांना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .
समाज प्रतिबिंब बहुउद्देशीय संस्था व बी एस एफ बहुउद्देशीय संस्था आणि उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नाशिक शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे यावेळी सामाजिक कृषी क्रीडा उद्योग शैक्षणिक संस्था प्रशासकीय कला व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 70 लोकांना हा महाराष्ट्र नायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा मे महिन्यात नाशिक येथे पार पडणार आहे अशी माहिती या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक भूषण सरदार यांनी प्रसिद्धी पत्रिका द्वारे जाहीर केले आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधी बोलताना अंजली जाधव यांनी दिली आहे
Comments
Post a Comment