मांजरसुंबा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न.

मांजरसुंबा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न.

उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांची उपस्थिती. 
बीड प्रतिनिदी
बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी तसेच अरुण रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील मोठ्या प्रमाणावर सरपंच, तसेच शेतकरी, शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अर्ज भरणे, लाडकी बहीण योजना अर्ज, ६० वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत एसटी पास, एमएसईबी संदर्भातील कामे, जिवंत सातबारा योजना, डिजिटल सातबारा, वारस फेरफार, वर्ग १ ते २ रूपांतर, ई-पीक पाहणी, कर्जमाफी योजना, फार्मर आयडी दुरुस्ती, जात प्रमाणपत्र व विविध दाखले वाटप, ई-वसुली पावती, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, पानंद रस्ते योजना, रस्त्यांच्या नोंदी केवायसी प्रक्रिया, आधार कॅम्प, ई-शिधापत्रिका वाटप, अभिलेख दुरुस्ती, लक्ष्मी मुक्ती योजना लाभ वाटप, घरकुलासाठी वाळू वाटप तसेच सेवा मित्र प्रमाणपत्र आदी सेवांचा समावेश होता.
या अभियानाचा मुख्य उद्देश शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा होता. शिबिरात महसूल विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, विद्युत विभाग, भूमिअभिलेख विभाग, पंचायत विभाग, CSC सेंटर तसेच निवडणूक विभाग यांच्या विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.यावेळी मंडळाधिकारी सोनाली कदम, दिपाली आघाव, पंडित नाईकवाडे, तलाठी मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम आंधळे, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव चौरे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर अशोक शेळके, ग्राम महसूल अधिकारी माणिक पांढरे, अविनाश माळवे, लक्ष्मण ओव्हाळ, आशा घाडगे, रेश्मा तणगे, अश्विनी डोळस, गणपत पोतदार, कमलेश निर्मळ, उत्तरेश्वर खांडे,प्रशांत नलावडे, महसूल सेवक ललित काकडे, बाबासाहेब बिरलिंगे, अश्विनी भोसले तसेच मांजरसुंबा सर्कलमधील सर्व गावांचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी