नागसेन बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी
बीड | दि. 01 मे 2026 (प्रतिनिधी)
नागसेन बुद्धविहार येथे आज बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्धमूर्तीच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण व ध्वजवंदना घेण्यात आली. पुढे महात्मा गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
या प्रसंगी उमाजी वाघमारे, काशीनाथ वाघमारे, केशरताई कांबळे, प्रा. व्ही. आर. गाडे, सुनिल कांबळे, एस. ए. सोनवणे आणि सर्वदे ताई यांनी बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व विशद केले.
दरम्यान, आज वाढदिवस असलेले एस. ए. सोनवणे व आरुष सिरसठ यांचा नागसेन बुद्धविहाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी शरणागत प्रार्थनेने सांगता करण्यात आली. उपस्थितांसाठी भोजनदान एस. ए. सोनवणे यांनी, खीरदान ए. एस. उजगरे (बापू) यांनी, तसेच अल्पोपहार (केळी) आरुष सिरसठ यांनी दिला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.
Comments
Post a Comment