भालचंद्र विद्यालयाची निकालाची परंपरा कायम; बारावी परीक्षेत ९४.१५ टक्के यश
लिंबागणेश : भालचंद्र विद्यालयाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत एकूण ९४.१५ टक्के निकाल नोंदविला आहे. विज्ञान शाखेत ९७.७० टक्के तर कला शाखेत ९०.४७ टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेसाठी एकूण ८७ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २ विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले. विद्यालयातून विज्ञान शाखेत गुणानुक्रमे संकेत प्रताप जोगदंड (७५.५० टक्के), चैतन्य अंकुश घोलप (७५.०० टक्के), सिद्धी नितीन संचेती (६८.३३ टक्के), राधिका संतराम ढास (६७.१७ टक्के), चैतन्य अप्पाराव मुळे (६५.३३ टक्के) व सार्थक कुमार पवार (६५.३३ टक्के) यांनी यश संपादन केले.
विज्ञान शाखेत २ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून २५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
कला शाखेत ८४ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमे हरिओम शहाजी घोडके (७५.१७ टक्के), रोहन सुखदेव भोसले (७३.५० टक्के), रत्नाकर सतीश मोरे (७३.०० टक्के), संदीप राजेश वाडमारे (७०.५० टक्के) व अदिती पांडुरंग माने (६९.५० टक्के) यांनी आघाडी घेतली.
कला शाखेत १ विद्यार्थ्याने विशेष प्राविण्य मिळविले असून २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव दीपक (दादा) घुमरे, अध्यक्ष यू.बी. सुकाळे (अप्पा), उपाध्यक्ष कल्याण (बापू) वाणी, संचालक नामदेव (नाना) जाधव, रमेशचंद्र पाटील, दिलीप बारगजे, प्राचार्य सावंत के. बी., पर्यवेक्षक हवळे ए. एम. तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment