"सत्य" परेशान हो सकता है, लेकिन "पराजित" नाही —अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त— माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड
"सत्य" परेशान हो सकता है, लेकिन "पराजित" नाही —अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त
— माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड
बीड (प्रतिनिधी):
“सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही,” असे भावनिक उद्गार आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी व्यक्त केले. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सत्य कधीच पराजित होत नाही, अखेर सत्य समोर आले आणि न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
अरविंद केजरीवाल यांच्या निर्दोष मुक्ततेच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात आम आदमी पार्टीच्या वतीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. चौकामध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव येडे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, जिल्हा कमिटी सदस्य माऊली शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण, तालुकाध्यक्ष आजम खान, शेतकरी संघटना पदाधिकारी कुलदीप करपे सो किस्किंदाताई पांचाळ सामाजिक कार्यकर्त्या राजेंद्र आमटे शेतकरी हक्क मोर्चा संगमेश्वर आंधळकर सामाजिक कार्यकर्ते विनोद जी मगर सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment