नगर नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक रोडवर अपघात वाढले,स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत- नितीन सोनवणे
नगर नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक रोडवर अपघात वाढले,स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत- नितीन सोनवणे.
बीड प्रतिनिधी : शहरातील नगर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान नुकतेच नवीन सिमेंट रोड झाल्याने वाहनांचा वेग धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. डिव्हायडर नसल्यामुळे मोटरसायकलस्वार रॉंग साईडने धावत असून, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तहसील कार्यालय आणि जिल्हा न्यायालय या महत्वाच्या ठिकाणांच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.टू-व्हीलर, फोर-व्हीलर तसेच मोठे ट्रक्स सुसाट वेगाने धावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः जिल्हा न्यायालय परिसरात वर्दळ जास्त असल्याने अनेक अपघातांची नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने नितीन सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. त्यात नगर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या संपूर्ण रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्पीड ब्रेकर हे वाहनांचा वेग नियंत्रित करण्याचे प्रभावी साधन आहे. योग्य ठिकाणी बसवलेले स्पीड ब्रेकर वाहनांचा वेग ४०% पर्यंत कमी करू शकतात. पुण्यासारख्या शहरात शाळा परिसरात स्पीड ब्रेकर बसवल्याने अपघातांचे प्रमाण ६०% पर्यंत कमी झाल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. कमी वेगामुळे चालकांना प्रतिसाद देण्यासाठी जास्त वेळ मिळतो, पादचारी आणि कमकुवत रस्ता वापरणाऱ्यांची सुरक्षा वाढते. यामुळे अपघात रोखता येतात, ट्रॅफिक नियमांचे पालन वाढते आणि निवासी भागात ध्वनी प्रदूषणही कमी होते.हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड यांना पाठवण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी एकच मागणी व्यक्त होत आहे. स्पीड ब्रेकर IRC नियमांनुसार योग्यरित्या बसवले जावेत, जेणेकरून अपघात रोखता येतील आणि रस्ते सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment