लिंबागणेश भुमिपुत्र डॉ. विशाल मुळे यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड; ग्रामस्थांकडून हृद्य सत्कार
लिंबागणेश भुमिपुत्र डॉ. विशाल मुळे यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड; ग्रामस्थांकडून हृद्य सत्कार
लिंबागणेश (दि.०२): बीड तालुक्यातील लिंबागणेश गावचे भुमिपुत्र डॉ. विशाल मुळे यांनी एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर एम.डी. (फार्माकोलॉजी) अभ्यासक्रमासाठी निवड मिळविल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वडील कल्याण,आई मीरा मुळे यांचा सहकुटुंब हृद्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ.गणेश ढवळे यांनी केले.यावेळी माजी सरपंच बाळासाहेब मुळे,कृष्णा पितळे,पोहे.परमेश्वर तागड, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांची समायोजित भाषणे झाली.
शेतकरी कुटुंबातील डॉ. विशाल मुळे यांचे शालेय शिक्षण लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालय, लिंबागणेश येथे झाले. त्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून एमबीबीएस पदवी संपादन केली.
पदवी शिक्षणानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका येथे दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. आता त्यांची एम.डी. (फार्माकोलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, जुहू येथे निवड झाली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. प्रमुख उपस्थितीत माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, माजी सरपंच बाळकृष्ण मुळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, महादेव कुदळे, बाळकृष्ण थोरात,पत्रकार हरिओम क्षीरसागर, रमेश गायकवाड, अँड.गणेश वाणी, रामकिसन गिरे,संदीप मुळे, संतोष भोसले, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, रामदास मुळे, शहादेव धलपे, नाना वाणी, किसन आबदार, सुभाष मुळे, विनायक वाणी, रामकिसन गिरे, कृष्णा पितळे, रामचंद्र मुळे , जयदेव गिरे,हौसराव भोजणे, शिवाजी वाणी, श्रीराम वायभट,जिवन मुळे,प्रविण मुळे, रोहित तागड,संभाजी मुळे, प्रकाश मुळे, विश्वंभर मुळे,नवनाथ मुळे, बालाजी मुळे, सोनाली मुळे,मीरा मुळे,
आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील युवकांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या या यशस्वी वाटचालीबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त करत पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment