पाटोदा नगरपंचायत प्रशासनाविरोधात नवनाथ जावळे यांचा एल्गार; चौकशी न झाल्यास आत्मदहनाचा इशारा


पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत नवनाथ जावळे यांनी दि. 05 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी निवेदन सादर केले असून प्रशासनाविरोधात गंभीर आणि थेट आरोप केले आहेत 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व मुद्यांवर ठोस कारवाई न झाल्यास दि. 02 मार्च 2026 रोजी आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.निवेदनात त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, त्यांच्या मुलाचे मागील दहा वर्षांपासून वेतन रोखून ठेवण्यात आले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वार्ड क्र. 12 मध्ये नागरिकांची कोणतीही मागणी नसताना रस्ते व स्वच्छ पाणी योजनांच्या नावाखाली बोगस कामे राबविण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करत त्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.मंगेवाडी येथे सर्व गावकऱ्यांना नगरपंचायतीमार्फत नळजोडणी देण्यात आली; मात्र आपण एकमेव मागासवर्गीय असल्याने जातीय आकसातून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप जावळे यांनी केला आहे. हा प्रकार सामाजिक समतेला काळिमा फासणारा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. नगरपंचायतीच्या नदीघाट व सुशोभीकरण कामादरम्यान सुमारे 75 हजार रुपये किमतीचे स्वतःचे ऑईल इंजिन संगनमताने चोरीस गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीघाटाखालील 3 इंची पाईपलाईन कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आल्याचा दावा करत या प्रकारामागील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रमाई आवास योजना अंतर्गत त्यांच्या मुलीला घरकुलाचा प्रथम हप्ता जातीय आकसातून देण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच पाटोदा नगरपंचायतीतील बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांची मागील व आतापर्यंतची निष्पक्ष चौकशी करून गैरप्रकार उघड करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.यासोबतच रमाई आवास योजना राबविणारी पठाण यांची एजन्सी तात्काळ हटवून दुसरी एजन्सी नियुक्त करावी, जेणेकरून पुढील गैरप्रकारांना आळा बसेल, अशी ठाम भूमिका जावळे यांनी घेतली आहे. दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व मुद्यांवर समाधानकारक व ठोस कारवाई न झाल्यास दि. 02 मार्च 2026 रोजी आत्मदहन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पाटोदा शहरात संतापाची लाट उसळली असून नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी