बोरफडी येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू येणार

बोरफडी येथे आज सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू येणार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत कार्यक्रमास उपस्थित रहा -सरपंच कैलास घुगे
बीड (प्रतिनिधी)
दि.१९ : गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार व प्रसिद्धीसाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आज (दि.२०) सकाळी १० वाजता बीड तालुक्यातील बोरफडी येथे भेट देणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन बोरफडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच कैलास घुगे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे तसेच गटविकास अधिकारी अनिकेत सानप उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान विविध विकासकामांची पाहणी तसेच नवीन कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या अभियानामुळे ग्रामविकासाच्या योजनांना अधिक गती मिळणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सरपंच कैलास घुगे यांनी केले आहे.

चौकट
कैलास घुगे यांनी केला गावाचा कायापालट

बोरफडीचे सरपंच कैलास घुगे यांच्या नेतृत्वाखाली गावातील प्रत्येक वस्तीपर्यंत रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधा पोहोचविण्यात आल्या आहेत. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत उभारण्यात आली आहे. गावात अनेक ठिकाणी आसन व्यवस्था, उद्यान निर्मिती, वृक्षलागवड तसेच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहेत. या सर्व उपक्रमांमुळे बोरफडी हे गाव आदर्श गाव म्हणून नावारूपाला येत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी