जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदबहुजन समाजाच्या एकतेचा, प्रबोधनाचा आणि धम्मदीक्षेचा भव्य सोहळा


परळी (प्रतिनिधी):
ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर, ता. धारूर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. मृगदायवन महाविहार, सारनाथ पार्क परिसर, जवळा फकीर येथे होणाऱ्या या धम्ममय सोहळ्यास बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे.

या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ. प्रा. खेमधम्मो (मुळावा) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो (पूर्णा) राहणार आहेत. ध्वजारोहणाचा मान डॉ. प्रा. भदन्त एम. सत्यपाल महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) यांना मिळणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून पु. भदन्त डॉ. इंदवंश महाथेरो (कुशीनगर, उत्तर प्रदेश), भदन्त मुदितानंद महाथेरो (परभणी), भदन्त पय्याबोधी थेरो (नांदेड), भदन्त पय्यानंद थेरो (लातूर) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच भदन्त धम्मसार थेरो (किल्लारी), भदन्त सुभूती थेरो (नांदेड), भदन्त धम्मशील थेरो (बीड), भदन्त नागसेन बोधी (उदगीर) आदी भन्ते या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे, रिपाई लातूरचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, ज्येष्ठ नेते श्रीकांत बनसोडे, आर. जी. कांबळे (अहमदपूर), बा. ह. वाघमारे (अहमदपूर), श्रीराम खळगे (माजलगाव), सतीश बनसोडे (सेलू), जयश्रीताई साळवे (बीड), ललिताताई उजगरे (माजलगाव), एस. एस. शिंदे (बीड), उत्तम डोंगरे (अंबाजोगाई), माधवराव वाघमारे (अंबाजोगाई), गोपीनाथ बनसोडे (बीड), स्नेहा खंडागळे (बीड), कचरूतात्या खळगे (माजलगाव), विनयजी ढवळे (अहमदपूर) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

मृगदायवन महाविहार उभारणीसाठी प्रभाकर सोनबा गवळी व शांता प्रभाकर गवळी या दाम्पत्याने उदार अंत:करणाने आपली जमीन दान देऊन धम्मकार्याला मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या दानशूर कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही परिषद बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार, बहुजन समाजाचे संघटन, नैतिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक परिवर्तनाचा दृढ संकल्प यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. बौद्ध उपासक-उपासिका तसेच बहुजन बांधवांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मकार्याला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या पवित्र धम्मतत्त्वाने प्रेरित होऊन जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी धम्मजागराचा ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी