लिंबागणेश येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन , तर ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने जयंती होणार साजरी.



लिंबागणेश प्रतिनिधी 
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गावातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत महाराजांना विनम्र अभिवादन केले. गावामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्य, पराक्रम व हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित युवक व ग्रामस्थांनी यंदाची होणारी पहिलीच जयंती अधिक मोठ्या प्रमाणावर आणि भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून साजरी करण्याबाबत चर्चा केली. गावातील सर्व समाजबांधव, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना एकत्र घेऊन जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यासाठी लवकरच नियोजन बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. “धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे शौर्य नवीन पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे,” अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच गावामध्ये ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेली भव्य मिरवणूक काढण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

यावेळी माजी कॅप्टन सुंदर भाऊ वाणी, मोहन दाजी कोटुळे, सुंदर येडे, राजेभाऊ जाधव, विक्रांत वाणी, अशोक वाणी, सुधीर वाणी, भरत वाणी, नितीन जाधव, फौजी कृष्णा ढवळे, दिनेश जाधव, गणेश वेदपाठक, अशोक वेदपाठक, विजय अगवान, ओंकार पवार, संदिप मुळे, केशव गिरे, सत्यम मंडलिक, जाधव भैय्या, अक्षय ढवळे, सोनू कुदळे, प्रदीप वाणी, अक्षय नाईकवाडे, महेश ढास अंगणवाडी सेविका श्रीमती बबिता ताई निर्मळ व पत्रकार हरिओम क्षीरसागर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील युवकांनी एकत्र येत घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून, यंदाची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती लिंबागणेश गावासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

Comments