लोकशाही मराठीचे बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास तावरे यांना पद्म पाणी राज्य राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कार जाहीर
लोकशाही मराठीचे बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास तावरे यांना पद्म पाणी राज्य राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कार जाहीर...!
बीड जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 17 मे रोजी होणार पुरस्काराचे वितरण
बीड प्रतिनिधी -प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पद्म पाणी संस्थेचे पुरस्कार अनेक मान्यवरांना जाहीर त्यामध्ये लोकशाही मराठीचे बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास तावरे यांना या वर्षीचा राज्य राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कार जाहीर झाला असून गेली 10 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात जिद्द चिकाटी आणि मेहनत तसेच सामाजिक, राजकीय व शेतकऱ्यांसाठी, ऊसतोड मजुरांसाठी सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर बीड जिल्ह्यातील कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जीव ओतून काम करणारे म्हणून हरिदास तावरे यांची ओळख आहे याच कामाची दखल घेत पद्म पाणी या संस्थेने हरिदास तावरे यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे पुरस्काराचे वितरण 17 मे रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
Comments
Post a Comment