पाटोदा बाजार समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर तोडा;- नगरसेवक संतोष जाधव यांची मागणी



पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील बाजार समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या डिव्हायडरमुळे मोठ्या वाहनांना अडचणी निर्माण होत असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित डिव्हायडर तात्काळ तोडण्याची मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे तसेच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजार समितीकडे येणाऱ्या मोठमोठ्या मालवाहू गाड्यांना वळण घेताना किंवा थांबताना पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी, ही वाहने मुख्य रस्त्यावरच उभी राहतात आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. विशेषतः सकाळी व दुपारच्या वेळेत ट्रॅफिकची समस्या अधिक तीव्र होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आपत्कालीन सेवा, शालेय वाहतूक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी