लेखक भटू हरचंद जगदेव यांच्या माप कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न


( प्रतिनिधी /भिवंडी)
 
 अनित्य प्रकाशन व वारकरी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगदेव भटू यांच्या "माप'' या कथासंग्रहाचे प्रकाशन अध्यक्ष साहित्यिक विजयकुमार भोईर, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते, साहित्यिक नवनाथ रणखांबे, प्रमुख पाहुणे संपादिका सुप्रिया जाधव, वारकरी प्रकाशनाचे राहुल मुंडे आदी.मान्यवरांच्या हस्ते स्काऊट ग्राउंड सदाशिव पेठ पुणे येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी नवनाथ आनंदा रणखांबे , राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार , विजयकुमार भोईर राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार , श्रीकृष्ण टोबरे जागल्या पुरस्कार, सुरेखा गायकवाड हिरकणी पुरस्कार इत्यादी. पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
    यावेळी बोलताना विजय कुमार भोईर म्हणले की, माफ या कविता संग्रहातील कथा छान आहेत . नवनाथ रणखांबे यावेळी बोलतांना म्हणाले की, जगदेव भटू यांचा “माप” हा कथा संग्रह केवळ वाचण्याचा अनुभव देत नाही; तर तो वाचकाला विचार करायला, स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरित करतो. तर भरत सातपुते यांनी माप कथासंग्रहाचे लेखक भटू जगदेव यांनी कथा लिहिताना आपले तन मन ओतून कथासंग्रहाला चांगला आकार दिला आहे. या कथा संग्रहात जयभीम कथा चांगली पावर फुल आहे. असे मत मांडले

तसेच काही मान्यवरांच्या प्रेरणादायी कार्याला बघून त्यांचे कार्याचे मोल म्हणून त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड उमाकांत आदमाने केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी