परमपूज्य गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या शुभहस्ते मानूर येथे डॉ. जितीन वंजारे यांच्या संजीवनी क्लीनिक चे उदघाटन संपन्न



बीड प्रतिनिधी :- दिनांक 31 मार्च 2026 रोजी मौजे मानूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी श्री. ष.ब्र. 108 गुरुविरुपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या शुभहस्ते डॉक्टर जितीन वंजारे यांच्या संजीवनी क्लिनिक चे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.मानूर या ऐतिहासिक नगरीत आणि पुरातन बाजारपेठ असूनही येथे रुग्णाचे हाल होतात येथे दर्जेदार एमेरजन्शी वैद्यकीय सेवा मिळत नसल्या कारणाने गावाकऱ्यांच्या सहकार्याने डॉ जितीन वंजारे यांनी येथे सेवा देण्याचा निर्णय घेतला आणि दिनांक 31 मार्च रोजी सर्वांच्या उपस्थिती त संजीवनी क्लिनिक चा उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मानूर नगरीचे जेष्ठ नेते दशरथरावजी वणवे दादा माजी जी प सदस्य यांनी लागेल ते सहकार्य करू, वैद्यकीय सेवा चांगली पुरवा, जास्तीत जास्त वेळ देता येईल हे प्रयत्न करा आणि गावाकऱ्यांची सेवा करा असे आपल्या भाषणात बोलले यानंतर जी प सदस्य रामदास नाना बडे यांनी आपल्या भाषणात डॉ जितीन वंजारे यांना शुभेच्छा दिल्या आणि मानूर नगरीत डॉक्टर ची नितांत गरज आहे, वाटेल ते सहकार्य करू, किफायतशीर दरात योग्य सेवा द्या असे बोलून शुभेच्छा दिल्या. अंबिकानगर चें माजी सरपंच बाबासाहेब ढाकणे यांनीही डॉ वंजारे यांना शुभेच्छा दिल्या टाकळी येथे डॉक्टरांना जागा देऊन टाकळी करांची रात्री अपरात्री वैद्यकीय सेवा दिली त्याबद्दल आभार मानले त्याच बरोबर जयसिंगकाका सिरसाठ यांनी नूतन क्लिनिक ला शुभेच्छा दिल्या त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परमपूज्य श्री. ष. ब्र.108 गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराजांनी सबोधन केले डॉ वंजारे यांच्या हातून मानूरकरांची आणि टाकळी करांची सेवा घडो, त्यांनी योग्य मार्गदर्शन आणि उपचार करून नाव लौकिक करावे मानूर संस्थान आपल्या सोबत आहे असे उद्गार काढले. परमपूज्य श्री ष. ब्र.108 गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज आणि इतर सर्वांनी फित कापून व पहिले वीरूपाक्ष मानूरकर महाराजांच्या प्रतिनेच पूजन केल. यानंतर अल्पहार व स्वीट घेऊन कार्यक्रमांची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मानूर नगरीचे सुप्रसिद्ध नेते मा. दशरथदादा वनवे माजी जिल्हा परिषद सदस्य, मा. रामदास बडे नाना जिल्हा परिषद सदस्य,मा. गहीनाथ दादा शिरसाठ सभापती, मा.अशोक मामा पाखरे सरपंच मा.खलंदर काका पठाण समाजसेवक,मा. मोहबत खान पठाण उपसरपंच, मा. पोपटआण्णा शिरसाठ,मा आशरभभाई सय्यद माजी उपसरपंच मानूर, आदिनाथ आबा नागरगोजे युवा नेते,अर्जुन मामा पाखरे, भरत मामा पाखरे, बाळासाहेब शिंदे, अमोल पवार, जमील पठाण आयुब पठाण सोहेल पठाण, शौकत पठाण, दिलीप शिरसाठ, खलील पठाण पत्रकार,बाबासाहेब ढाकणे माजी सरपंच अंबिकानगर, मच्छिन्द्र मानकर मामा,सुदर्शन पाटील,अशोक भाऊ शिरसाठ,युवानेते सोहेल पठाण,जयसिंग काका शिरसाठ,प्रभू देठे,शौकत भाई सय्यद,शहबाज पठाण, भाऊसाहेब साबळे,कुंदन बडे, केशव शिरसाठ सर,आनंद जाधव युवा नेते, शिवा रुचके,नाशेर पठाण, बडे सर, समीर पठाण, निजाम बेग भगवान पाखरे, शंभो शिंदे, इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी