के के वाघ विद्याभवनात हनुमान जन्मोत्सव उत्साहात.
निफाड.ता-२यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक:-.के के वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर येथील 'क्रीडा विभागातर्फे' प्राचार्य दिवाकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. प्रमुख अतिथी समन्वयक यशवंत ढगे उपमुख्यध्यापिका सुनीता वडघुले,पर्यवेक्षक डि.के मोरे,ज्युनि.कॉलेज प्रमुख बस्तीराम रानडे,जेष्ठ शिक्षक आर.डी. गांगुर्डे,प्रवीण रणदिवे,बाजीराव वाघ,राजेंद्र उगले,मनोज तुसे,संदीप खिस्ते,संजय धनगर,निलेश पाटील,राकेश तोरवणे,अनिल शिंगणकर,अमोल वाघमारे,क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर, शीतल साळी,कांचन सोनार,गायत्री आंबेकर,शारदा पेलमहाले,अश्विनी जावळे, किरण कदम,उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य दिवाकर शेजवळ यांनी रामभक्त हनुमान हे शक्ती आणि बुद्धीची देवता मानले जातात त्यामुळे मारुतीरायाची आराधना करून बळ आणि विद्या मिळवण्यासाठी विद्यार्थी खेळाडू व्यायामाद्वारे व शैक्षणिक पुस्तके वाचून विद्यार्जन करतात.तसेच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेदरम्यान,व्यायाम शाळांमध्ये हनुमानाची सर्वत्र पूजा केली जाते असे प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी समन्वयक श्री यशवंत ढगे यांनी रामायणातील काही प्रसंग सांगून हनुमानाकडून प्रेरणा घेत शैक्षणिक वाटचाल करावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर यांनी केले.
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख प्रकाश गोतरणे,प्रज्वल वाघ,शिक्षिका नीता विसपुते,पूजा बोंबले, दिपाली पवार व विद्यार्थी खेळाडूंनी परिश्रम घेतले.
(फोटो-पूजन प्रसंगी प्राचार्य दिवाकर शेजवळ, समन्वयक यशवंत ढगे,उपमुख्याद्यापीका सुनीता वडघुले,पर्यवेक्षक डि.के मोरे,बस्तीराम रानडे,क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर व शिक्षक शिक्षिका वृंद)
Comments
Post a Comment