अंबाजोगाई कृषी विभागात महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या अनेक योजना कागदावरच- लोकजनशक्ती पार्टी (रा)
अंबाजोगाई : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात उदा.
1)नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
2)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
3)प्रधानमंत्री पिक विमा योजना मागेल त्याला शेततळे योजना 4)ठिबक व तुषार सिंचन योजना जलयुक्त शिवार अभियान योजना
5)कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ट्रॅक्टर अवजारे खरेदी योजना
6)सोलर स्प्रे पंप अनुदान योजना
7)एकात्मिक उत्पादन विकास अभियान योजना
8)राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना
9)शरद पवार ग्राम समृद्धी योजना
10)प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना
11) बी बियाणे स्वस्त दरात किंवा मोफत वाटप योजना
अशा अनेक योजना महाडीबीटी पोर्टल द्वारे चालवल्या जातात या योजना भरण्यासाठी किंवा पाहण्यासाठी अँड्रॉइड स्वरूपाचा मोबाईल लागतो प्रत्येक शेतकऱ्याकडे अशा प्रकारचा मोबाईल नसल्यामुळे अनेक योजना कागदावरच दिसत आहेत तालुका कृषी अधिकारी मोहीम अधिकारी कृषी सेवक कृषी सहाय्यक असे विविध अधिकारी आंबेजोगाई तालुक्याला लाभले असताना सुद्धा हे अधिकारी शेतकऱ्यांची उद्धटपणे व अरे तुरे बोलतात शेतकरी हे कमी शिकलेला फायदा घेऊन संबंधित अधिकारी महाडीबीटी पोर्टल द्वारे देण्यात येणारे विविध धान्य उदाहरणार्थ गहू ज्वारी तीळ हरभरा असे अनेक बियाणे काळया बाजारात विकत असल्याची चर्चा आंबेजोगाई तालुक्यात रंगू लागली आहे संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी या योजनेचे काटेकोरपणे पालन करावे या आशयाचे निवेदन लोक जनशक्ती पार्टी च्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले यावेळी लोक जनशक्ती पार्टी युवा चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे भीमरावजी सरवदे साहेब अशोक काळे विशाल शेवाळे गंगाधर पोळ फिरोज शेख अझर सय्यद आदित्य चौरे जर हा मनमानी कारभार लवकरात लवकर थांबला नाही तर बीड जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी
Comments
Post a Comment