नेपाळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही खासगी शाळा बंद करून सर्व विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत शिक्षण द्यावा – नगरसेवक संतोष दादा जाधव यांची मागणी


पाटोदा (प्रतिनिधी ) नेपाळमध्ये खासगी शाळा बंद करून सर्व विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातही अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक संतोष दादा जाधव यांनी केली आहे.जाधव म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात समानता निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आज खासगी शाळांच्या वाढत्या फीमुळे अनेक पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व मुलांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवून त्या अधिक सक्षम केल्यास समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी आणि सर्वांसाठी एकसमान शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेपाळप्रमाणे धाडसी निर्णय घ्यावा,अशी मागणी नगरसेवक संतोष दादा जाधव यांनी केली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी