गाडगेबाबांच्या विचारांची परंपरा जपणाऱ्या सभेत फुले-जयंती उत्साहात, बारुळकरांना श्रद्धांजली
बीड ( प्रतिनिधी): कृतिशील समाजसुधारक, सत्यशोधक धर्माचे संस्थापक आणि शैक्षणिक-सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त बीड येथे अभिवादन करण्यात आले. याच वेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे किर्तन-प्रवचनातून जनप्रबोधन करणारे ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांच्या अकाली निधनाबद्दलही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गाडगेबाबांच्या समाजसुधार अभियानाची पताका खांद्यावर घेत चळवळ पुढे नेणारे ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांच्या निवासस्थानी आयोजित अभिवादन सभेत विविध मान्यवरांनी उपस्थित राहून आपली श्रद्धांजली अर्पण केली. जेष्ठ शिक्षक नेते व मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अशोक येडे, प्रबोधनकार ह.भ.प. नितीन महाराज पिसाळ, लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, पर्यावरणप्रेमी अभिमान खरसाडे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश मस्के, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. पंजाब येडे तसेच अनेक पदाधिकारी, शिक्षक व प्राध्यापकांनी यावेळी आपापल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संयोजक ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांनी मानले, तर संचालन ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज उबाळे यांनी केले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत समाजप्रबोधनाची गरज अधोरेखित केली.
Comments
Post a Comment