लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

लिंबागणेश (दि.११): बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश गायकवाड यांनी केले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, साहेबराव निर्मळ, अॅड. गणेश वाणी, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, जीवन मुळे, सुरेश निर्मळ, मोहनराव कोटुळे, महादेव वाणी, ज्ञानेश्वर कुदळे, संजय पावले, खंडू वाणी, श्रीराम तागड, भीमराव बोराटे, सुभाष मुळे, मल्हारी आबदार, पोपट निर्मळ आदी उपस्थित होते.
---

महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी” – डॉ. गणेश ढवळे

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला.

“विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...” हा महात्मा फुले यांचा विचार उद्धृत करत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले असून, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजाला नवी दिशा दिली, असे त्यांनी सांगितले.

तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षण सर्वांसाठी खुले केले. अज्ञानाचा अंधार दूर करून समाज सक्षम बनवण्याचा त्यांचा विचार आजही मार्गदर्शक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महात्मा फुले यांनी सत्यशोधक विचारातून समाजाला जागृत करत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. धर्माच्या नावाने चालणाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध करून “माणुसकी हाच खरा धर्म” असल्याचा संदेश त्यांनी दिला. शेतकरी हा देशाचा कणा असून तो अन्याय, कर्जबाजारीपणा व सामाजिक उपेक्षेखाली दबला जात असल्याचे वास्तवही त्यांनी मांडले, असे डॉ. ढवळे यांनी सांगितले.
सामाजिक समतेसाठी आयुष्यभर झटणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी