बीड नगर पालिकेच्या ताफ्यात अद्यावत स्वच्छता वाहन नव्या सत्ताधाऱ्याकडून लोकसेवेत दाखल
बीड नगर पालिकेच्या ताफ्यात अद्यावत स्वच्छता वाहन नव्या सत्ताधाऱ्याकडून लोकसेवेत दाखल .
आमदार विजयसिंह पंडित, व मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार - प्रेमलताताई पारवे, विनोद मुळूक
बीड : शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देणारी अत्याधुनिक आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद गाडी (Emergency Response Sanitation Unit) आज नगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली असून,स्व.अजित दादा पवार यांच्या सूचनेनुसार मा.ना.पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या आदेशानुसार मा.आमदार विजयसिंह पंडित व मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या पुढाकारातून ही गाडी बीड नगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाबद्दल नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आ.विजयसिंह पंडित साहेब ,जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
या गाडीचा अधिकृत शुभारंभ नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक,स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, प्रवक्ते भागवतजी तावरे, नगरसेवक,जैतुल्ला खान,शेख अशफाक इनामदार, मनोज गोडसे, नगरसेवक दत्ता जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या गाडीचे प्रात्यक्षिक पाहून तिच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही गाडी शहरातील गटार साफसफाई, सांडपाणी व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाडीत उच्च क्षमतेचे व्हॅक्युम सक्शन सिस्टम, हाय-प्रेशर जेटिंग मशीन, पाणी व कचरा साठवण टाक्या तसेच आधुनिक पाईप व नोजल प्रणाली उपलब्ध असून, त्यामुळे गटारातील अडथळे जलदगतीने दूर करणे शक्य होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात गटारे तुंबणे व पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होतात, अशा वेळी ही गाडी तत्काळ कार्यरत होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत करणार आहे.
यावेळी स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी या गाडीच्या फायद्यांबाबत सांगितले की, 1) गटार साफसफाई अधिक जलद व प्रभावी पद्धतीने होणार, 2) कामगारांना गटारात उतरावे लागणार नाही, त्यामुळे सुरक्षितता वाढणार, 3) हाय-प्रेशर जेटिंगमुळे अडथळे त्वरित दूर होणार, 4) आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार, 5) पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार, 6) स्वच्छता व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार, 7) वेळ, मनुष्यबळ व खर्चाची बचत होणार आणि 8) शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी राहण्यास मदत होणार.
या गाडीच्या वापरामुळे गटार साफसफाईसाठी कामगारांना प्रत्यक्ष गटारात उतरावे लागणार नाही, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला मोठे प्राधान्य मिळणार आहे. यंत्राद्वारे कामे पार पडल्यामुळे स्वच्छता व्यवस्थेत गती, कार्यक्षमता आणि सुरक्षितता या तिन्ही बाबींमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही गाडी नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असून, आपत्कालीन परिस्थितीतही तत्काळ प्रतिसाद देण्यास सक्षम ठरणार आहे.
तसेच, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी मांडलेली “बीड शहर स्वच्छ व सुस्थितीत असले पाहिजे” ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री नामदार सुनेत्राताई पवार तसेच आमदार विजयसिंह पंडित हे या दिशेने कटिबद्ध असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
नगरपालिका प्रशासनाने या अत्याधुनिक गाडीचा प्रभावी वापर करून शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एकूणच, ही गाडी बीड शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यास सहाय्यभूत ठरेल.
Comments
Post a Comment