नगर परिषद कर्मचाऱ्यांना जयंतीपूर्वी वेतन व १० हजार रुपये फेस्टिव्हल लोन देण्याची मागणी

परळी वै (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ११ एप्रिल व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल जयंतीनिमित्त नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच प्रत्येकी १० हजार रुपये अग्रीम (फेस्टिव्हल लोन) दि. १० एप्रिल २०२६ पूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, शाखा नगर परिषद परळी वै यांच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एप्रिल महिन्यात महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. या पार्श्वभूमीवर नगर परिषद कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत आणि ते जयंती उत्सव आनंदमय वातावरणात साजरा करू शकावेत, यासाठी वेतन वेळेवर देणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच कर्मचाऱ्यांना महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळावा यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये फेस्टिव्हल लोन देण्यात यावे व फरकाची रक्कमही अदा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या मासिक हप्त्यांची कपात एप्रिल महिन्यात न करता कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात यावे, अशीही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रमेश जगतकर व महासचिव विशाल वसंतराव बनसोडे यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना ही मागणी तातडीने मान्य करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी