नाशिक कुंभमेळ्यासाठी "स्वच्छ कुंभ- सुरक्षित कुंभ- प्लास्टिक मुक्त कुंभ" हे ब्रीदवाक्य द्यावे –चंदन पवार



2027 मध्ये नासिकमध्ये होत असलेल्या महाकुंभाचे लवकरच आगमन होत आहे, हा कुंभ म्हणजे नाशिककरांसाठी खूपच आनंदाचा क्षण आहे, ज्याप्रमाणे प्रयागराज मध्ये उत्तरप्रदेश सरकारने कुंभाचे नियोजन केले तेथील नियोजनाचा आराखडा बघता किंवा त्यापेक्षा दुपटीने चांगले नियोजन नाशिक मध्ये झाले पाहिजे, नाशिक मध्ये महाकुंभ होत असताना कुठलीही अप्रिय दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत असे पवार यांनी म्हटले आहे.

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लोकांच्या मनावर जर "स्वच्छ कुंभ-सुरक्षित कुंभ -प्लास्टिक मुक्त कुंभ" ही संकल्पना बिंबवली तर त्याचा नक्कीच कुंभमेळ्यासाठी फायदा होईल, त्यासाठी प्रशासनाने रस्त्यांच्या दर्शनी ठिकाणी, कुंभमेळ्याच्या ठिकाणी, संपूर्ण नाशिक शहरात आणि नाशिकच्या बाहेरील रस्त्यांवर ब्रीदवाक्याचे नाम फलक लावावेत, जेणेकरून नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक, नागरिक, प्रवाशी तो नाम फलक वाचून त्यावर विचार करून कार्य करतील परिणामी स्वच्छ, सुरक्षित आणि प्लास्टिक मुक्त कुंभमेळा होईल त्यामुळे प्रशासनावरीलही ताण कमी होईल, हे लक्षात घेतले पाहिजे, "स्वच्छ कुंभ-सुरक्षित कुंभ-प्लास्टिक मुक्त कुंभ" हे ब्रीदवाक्य याचा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मागणी भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आ.देवयानी फरांदे, आ,राहुल ढिकले, खासदार राजाभाऊ वाजे, विभागीय आयुक्त, प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे नमो विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष चंदन पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी