गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमती जास्त तुटवड्यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय सुरळीत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन.



गेवराई (प्रतिनिधी) दि.६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशानुसार आज राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने धरणे अंदोलन कारण्यात आले. या अंदोलनात गेवराई तालुक्याच्या वतिने राज्य उपाध्यक्ष प्रा. विष्णु जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पु) गायकवाड आणि जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पोकळे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडरचा केला जात असलेला कृत्रिम तुटवडा करुन अनेक गॅस एजन्सी धारक गॅसचा काळाबाजार करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी व केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ गेवराई तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
 यावेळी गॅस सिलेंडर समोर ठेवून "नरेंद्र कब देंगा सिलेंडर" अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी घोषणांमुळे तहसिल परिसर दणाणून गेला होता.
 या आंदोलनात जिल्हा सल्लागार सुदेश पोदार, तालुका महासचिव किशोर भोले, अनिल बोराडे, ज्ञानेश्वर हवाले, संजय शरणांगत, राजेंद्र साळवे, महेश काकडे, कृष्णा सामसे,प्रदिप शिंदे, दामु दारकोंडे, दशरथ साळवे, संतोष साळवे, नितीन साळवे, राम साबळे, अरुण कांबळे, शाहू साळवे, सुमित साळवे, बाळू साळवे, मावकर चव्हाण, ऋणीराज कांडेकर, जीवन साळवे, भगवान दारकोंडे, कृष्णा हातागळे, सदाशिव चव्हाण सह गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे व भारतिय बौध्द महासभा आणि सम्यक विद्यार्थी अंदोलनचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी