निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या आष्टी शहराध्यक्षपदी गणेश रोकडे यांची निवड


आष्टी : निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या आष्टी शहराध्यक्षपदी गणेश दिलीप रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राज्य संघटक बालाजी आबादार यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली.
या निवडीमुळे आष्टी शहरातील पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी रोकडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्ष विस्तार आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी ते सक्रिय भूमिका निभावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच पक्षाच्या नियमानुसार या नियुक्तीचे दर १०० दिवसांनी नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी