बीडमध्ये ओपन स्पेसचे व्यवस्थापन, कंपाउंड बांधकामासह गायरान जमिनींचे नियोजन करा

बीडमध्ये ओपन स्पेसचे व्यवस्थापन, कंपाउंड बांधकामासह गायरान जमिनींचे नियोजन करा

भाजपचे नगरसेवक मनोज घोंगडे यांची बीड न.प. प्रशासनाकडे मागणी 
बीड (प्रतिनिधी)
दि.१२ : शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भाजपच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मनोज घोंगडे यांनी बीड नगरपरिषदेच्या नियोजन व विकास समितीकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात ओपन स्पेसचे व्यवस्थापन, कंपाउंड बांधकाम तसेच गायरान जमिनींच्या नियोजनाचा समावेश आहे.

निवेदनात पुढे म्हटले की, शहरातील प्रत्येक वॉर्डमधील ओपन स्पेसची स्वतंत्र नोंद ठेवून त्याची माहिती संबंधित नगरसेवकांना देण्यात यावी. या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांच्या हितासाठी या मोकळ्या जागांचा योग्य व नियोजनबद्ध वापर व्हावा, यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय, शहरातील प्रत्येक ओपन स्पेसभोवती कंपाउंड उभारण्यात यावे, जेणेकरून त्या जागांचे संरक्षण होईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल. यामुळे शहराच्या नियोजनात शिस्त राहून नागरिकांना सुरक्षित मोकळी जागा उपलब्ध होईल. तसेच, शहरातील गायरान जमिनींवर घरकुलांसाठी भूखंड वाटप करताना प्रक्रिया सुलभ व पारदर्शक ठेवावी. गायरान जमिनींचे वाटप करताना नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या तिन्ही मागण्यांची अंमलबजावणी झाल्यास शहरातील नियोजन, पारदर्शकता आणि नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, बीड नगरपरिषद प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी