चऱ्हाटा गावची शेख रुक्सार पुणे शहर पोलिस दलात; महात्मा फुले विद्यालयात भव्य सत्कार, गावात उत्साहाची लहर



बीड, दि. १० एप्रिल २०२६
महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेच्या निकालात बीड जिल्ह्यातील चराटा गावची शेख रुक्सार युनूस हिने पुणे शहर पोलिस दलात यशस्वी निवड मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या अभिमानास्पद यशाबद्दल महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, चराटा येथे तिचा भव्य सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे, रुक्सारने पहिली ते बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण याच विद्यालयात घेतले असून, तिचे यश हे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे जिवंत उदाहरण ठरले आहे.

चराटा हे बीड शहराजवळील एक छोटे ग्रामीण गाव असून, येथील साध्या कुटुंबातील रुक्सार ही समाजसेवक शेख इनुस यांची धाकटी मुलगी आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले शेख इनुस हे गावात आदराचे स्थान असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रेरणेने आणि स्वतःच्या जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर रुक्सारने हे यश संपादन केले.

लहानपणापासूनच पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रुक्सारने शारीरिक तंदुरुस्ती, अभ्यास आणि मानसिक तयारी यावर सातत्याने मेहनत घेतली. अनेक अडचणींवर मात करत तिने हे स्वप्न साकार केले.

शाळेचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य माळी सर तसेच वारे सर, पवार सर, मार्कड सर, सानप सर, मिसाळ सर, शेख सर, अकलूवर मॅडम, ज्ञानेश्वर उबाळे आणि नामदार सर यांनी रुक्सारला सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले. शाळेतील सकारात्मक वातावरणामुळे तिच्या यशाला बळ मिळाले.

गावात आनंदोत्सवाचे वातावरण
रुक्सारच्या यशाची बातमी समजताच संपूर्ण गावात आनंदाची लहर पसरली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकरी तिच्या घरी जाऊन अभिनंदन करत आहेत.
“हे यश फक्त रुक्सारचे नसून संपूर्ण गावाचा अभिमान आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी ती प्रेरणास्थान आहे,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.

शेख इनुस म्हणाले, “माझ्या मुलीने आज आमचा आणि गावाचा सन्मान वाढवला आहे. तिच्या मेहनतीचा मला अभिमान आहे.”

रुक्सारचे हे यश बीड जिल्ह्यातील ग्रामीण युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत असून, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी