अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेले वृक्षारोपण चोरीला गेलेले आहे-लोक जनशक्ती पार्टी (रा)


अंबाजोगाई : बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी व प्रतिष्ठित समजली जाणारी नगरपरिषद असलेली आंबेजोगाई नगरपरिषद आहे अनेक नियमबाह्य गोष्टींमुळे अंबाजोगाई नगरपरिषद चर्चेत येत आहे अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौक ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच संत भगवान बाबा चौकाच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्षारोपण नगरपरिषदेच्या वतीने एका प्रायव्हेट एजन्सीला देण्यात आले या प्रायव्हेट एजन्सीने संबंधित काम हे लाखो रुपयांचा निधी उचलला आहे याचाच पाठपुरावा म्हणून लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून विविध निवेदन व आंदोलने केली परंतु झोपलेले प्रशासन जागी होताना दिसत नाही 14 वा व पंधरावा वित्त आयोगामधून कोठ्यावधींचे कामे अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये मागील चार वर्षात झाली त्यातील अनेक कामे कागदावरच आहेत याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अन्यथा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन मुख्य अधिकारी अंबाजोगाई यांना लोक जनशक्ती पार्टीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले यावेळी लोकजनशक्ती पार्टी (रा) युवा मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहूळे अशोक काळे विशाल शेवाळे फेरोज शेख इत्यादी उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी