जय भीम महोत्सव: जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न!

जय भीम महोत्सव: जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न!

 विद्यार्थ्यांनी आपले ध्येय उच्च ठेवावे : उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापुरुष जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा चे आयोजन बीड शहरातील तुलशी संगणक महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते .
दर सालाबादप्रमाणे या ही वर्षी समितीच्या वतीने जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आले .या स्पर्धेच्या तालुकास्तरीय स्पर्धेतून निवडक प्रथम दहा विद्यार्थ्यांची निवड केली होती .बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला. बीड जिल्ह्यातून एकूण या परीक्षेसाठी सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी जिल्हास्तरीय साठी 110 विद्यार्थी पात्रता धारक होते . सदर परीक्षा सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग आयु. नानाभाऊ हजारे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मध्ये विचार मंचावर प्रवीणकुमार तरकसे मुप्टचे जिल्हाध्यक्ष (माध्यमिक विभाग), कल्याण भंडारे (सेवानिवृत्त पीएसआय ),समितीचे मा. अशोक ठोकळ साहेब (सेवानिवृत्त एएसआय ),
जिल्हा स्पर्धा समिती प्रमुख प्रा. शशिकांत जावळे , जयंती उत्सव समितीचे प्रमुख मनोज वाघमारे , सुमेध जोगदंड सर,
बबन पंडित सर, युवा मल्हार सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्रा. रेखा निर्मळ, शिंदे साहेब आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 
सदर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेंना अभिवादन करून करण्यात आली. 
विद्यार्थ्यांनी आपली वाचन संस्कृती वाढवावी व चिकित्सक वृत्ती वाढवावी. या हेतूने आपले वर्तन असले पाहिजे.त्यासाठी आपले ध्येय हे उच्च असले पाहिजे .विद्यार्थ्यांना बारावीनंतर इतर स्कॉलरशिप द्वारे परदेशात शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी याकरता प्रयत्नशील राहील अशी ग्वाही नानाभाऊ हजारे यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात दिली. प्रमुख अतिथी प्रवीण तरकसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले पुस्तक हे मस्तक घडविण्याचे काम करते. 
 'वाचेल तोच वाचेल' हा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा स्पर्धा समिती प्रमुख प्राध्यापक शशिकांत जावळे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये स्पर्धेचा अनुभव व आढावा थोडक्यात दिला. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा ही जिल्ह्यामध्ये एक व्यापक वाचन संस्कृती चळवळ व्हावी असे मत व्यक्त केले.
सदर परीक्षेसाठी जिल्हाभरातून एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातून, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. कार्तिकी नंदू अनाप (एकलव्य विद्यालय शिरूर कासार,) द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून दोन विद्यार्थ्यांना देण्यात आले. कु. भार्गवी कैलास तुपे (एकलव्य विद्यालय शिरूर कासार )व कु. वैष्णवी संदीप थोरात (कालिका देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरूर कासार ) तर तिसरे पारितोषिक ही विभागून देण्यात आली यामध्ये स्वरा लक्ष्मीकांत भांडेकर ( न्यू स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल शिरूर) व यश राजकुमार जावळे (जवाहर नवोदय विद्यालय टा.ढो.) 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आली. 
सदर परीक्षेचे कामकाज प्रा.प्रशांत मळेकर यांच्या नियोजनाखाली प्रा. सुनील मोरे प्रा.अनिल जरे, प्रा. नारायण घोलप ,प्रा. अशोक सवासे, आप्पासाहेब कांबळे, जितेश उगलमुगले आदींनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख मनोज वाघमारे, सुमेध जोगदंड, मा.अशोक ठोकळ, प्रणित सरवदे, ॲड राजेश शिंदे, किरण निसर्गंध , प्रा. नारायण घोलप, प्रा. प्रकाश ढोकणे ,पि.डी. जावळे ,निलेश तरकसे , चंद्रकांत साळवे, प्रा. प्रकाश ढोकणे आदींनी परिश्रम घेतले.
तसेच सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी बक्षीस वाढविण्याची विनंती जिल्हा स्पर्धा समिती प्रमुख प्रा. शशिकांत जावळे यांनी केली त्यावर माननीय उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे यांनी पुढील वर्षीपासून बक्षीस माझ्या वतीने 25 हजार रुपये व प्रथम तीन गटामधून येणारे 9 विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाची भेट सहल देण्याचे त्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमा दरम्यान पूज्य भदंत विपश्यनाचार्य विनयरकीता महाथेरो व पूज्य भिकू धम्मशील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन महादेव इनकर सर तर प्रास्ताविक जिल्हा स्पर्धा समिती प्रमुख प्रा. शशिकांत जावळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.नारायण घोलप यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक ,पत्रकार यांची बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी