जनसुरक्षा विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू –रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष चा एल्गार

जनसुरक्षा विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू –रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष चा एल्गार
बीड, दि. १ एप्रिल (प्रतिनिधी):
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्ह्याच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून, कामगारविरोधी धोरणांचा निषेध करत देशव्यापी ‘काळा दिवस’ पाळण्याची घोषणा करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हाध्यक्ष रामधन रानबा जमाले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकामुळे लोकशाही मूल्यांना तडा जाईल तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार आहे. आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असून, यामुळे कामगार वर्गावर अन्याय होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कायदे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
इंटक च्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
 मुख्य मागण्या:
जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करावे.
कामगारविरोधी धोरणे मागे घ्यावीत.
कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करावे.
 शेवटचा इशारा:
इंटक बीड जिल्ह्याच्या वतीने सांगण्यात आले की, कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, आवश्यक असल्यास व्यापक आंदोलन उभारण्यात येईल. असे इंटक चे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले चा एल्गार.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी