नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने बाळासाहेबांचा अकोला पॅटर्न राज्यात राबवावा - सुजातदादा आंबेडकर
            परळी प्रतिनिधी -     नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न राज्य सरकारने अमलात आणावा व तातडीने नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना पंधरा हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजातदादा आंबेडकर यांनी केली आहे. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य एल्गार महा सभेत बोलत होते.       वंचित बहुजन आघाडी परळी तालुक्याच्या वतीने शहरातील श्रद्धा मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या भव्य एल्गार सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक  म्हणून राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण सर, राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद सर, बीड जिल्हा अध्यक्ष पूर्व शैलेश भाऊ कांबळे, जिल्हाध्यक्ष पश्चिम, अजय सरवदे ,सचिन उजगरे ,धम्मानंद साळवे, अंकुशराव जाधव, भारत तांगडे बालासाहेब जगतकर आदी मान्यवर उपस्थित होते. ता. अध्यक्ष गौ...