ओला दुष्काळ जाहीर करा व एकरी 50,000 रु अनुदान द्या-माऊली मार्कड
राज्यातल्या शेतकरी आर्थिक संकटात, सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी ,राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक
बीड प्रतिनिधी .अंकुश गवळी
गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे... बीड जिल्ह्यात सततच्या पावसाने सोयाबीन, कापूस, तूर व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच शेतमजुरांचा सुद्धा रोजगार बुडाला आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने जबाबदारी घेऊन मदत करावी. कारण या अतिवृष्टी व ढगफुटीने शेतकऱ्यांच , शेतमजूरांच , कामगारांच मोठ नुकसान झालेलं आहे शेती पुरपणे पुराच्या पाण्यान वाहुन गेली.काही ठिकाणी मातीसह खरडुन गेली.व शेतात पाणी साचल्याने पीक नुकसान झाली आहे .या मुळे शेतकऱ्यांच उत्पादन शुन्य होणार आहे. आता पर्यंत केलेला खर्च हा पुर्णपणे बुडाला .व शेती आता कसण्या योग्य करण्यासाठी खूप मोठा खर्च शेतकऱ्यांना येणार आहे .तरी सरकारने भरघोस कशी मदत करावी म्हणजे एकरी 50,000 रु . द्यावे .शेतकऱ्यांना  उत्पादन शुन्य झाल्याने शेतमजूरांना  कोणी मजूर म्हणून कामावर बोलवणार नाही त्यांना मंजुरी मिळणार नाही. पर्याने उपासमारीची वेळ हि शेतमजूरांवर येणार आहे.   त्यामुळे एकंदरीतच सरकारने गांभीर्याने या विषयाकडे लक्ष द्यावे व मराठवाड्यातील  ग्रामीण अर्थव्यवस्था सुव्यवस्थित आणण्यासाठी खालील मागण्याची अंमलबजावणी करावी.
मागण्या:-
1. संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना एकरी 50000 पन्नास हजार रुपये मदत द्या.
. सरसकट संपूर्ण पीक कर्जमाफी करा.
 सर्व शेतमजुरांना 10000 दहा हजार रुपये मदत द्या.
शेतकरी शेतमजुर तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या विद्यार्थी पाल्यांची  शालेय  व महाविद्यालयीन संपूर्ण वर्षाची फी माफ करा..
पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्या व त्यांचे पुनर्वसन करा...
एनडीआरफ च्या निकषाच्या चार पट मदत सरकारने करावी अशी मागणी.राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा अध्यक्ष विक्रम बप्पा सोनसळे. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा अध्यक्ष माऊली मार्कड . रासप जिल्हाध्यक्ष बीड साईनाथ विघ्ने .युवक जिल्हाध्यक्ष मधुकर केदार सर. रासप तालुका अध्यक्ष शिरूर शाम माहनोर. उप तालुका अध्यक्ष नामदेव ढाकणे. विद्यार्थी तालुकाध्यक्ष चक्रधर सानप. यांच्या वतीने  करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment