कामगार राज्य मंत्री अशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न


मुंबई ( प्रतिनिधी )आज दिनांक ३०/०९/२०२५ ला मुंबई मंत्रालयामध्ये कामगार राज्यमंत्री मा.ना. अशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.अशी माहिती स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती चे उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांनी दिली. बैठकीमध्ये स्वाभिमानी महानिर्मिती कृती समिती यांनी घेतलेले कामगार हिताचे विषय

स्वातंत्र्य उद्योग मुळ किमान वेतन, ESIC च्या रकमेची मर्यादा वाढवणे म्हणजे २१००० हजारावरून ३०००० हजारापर्यंत करणे किंवा बेसिक DA वर राज्य विमा कपात करणे, 1983 पासून 5% वरून 40% वर करणे असे संपूर्ण विषय कामगार राज्य मंत्री माननीय जयस्वाल साहेब यांनी सकारात्मकता आजच्या बैठकीमध्ये दाखवली. येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये स्वातंत्र्य उद्योग होण्याचे निर्देश कामगार 
विभागाला दिले, औष्णिक विद्युत केंद्र पारस चा परिमंडळ २ चा विषय माननीय कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब यांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. त्यावेळेस मा. नितीन वाघ, कार्यकारी संचालक मानव संसाधन विभाग महानिर्मिती यांनी परिमंडळ दोन चा मुद्दा लवकरच सोडविण्यात यईल असे सांगितले, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन व अनुषंगिक लाभ मिळत नाहीत, तशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली तर त्यांना अयोग्य व बेकायदेशीररित्या कामावरून कमी केले जाते असे भाई गौतम आगळे सर यांनी सांगितले, तेव्हा मंत्री महोदय यांनी यावर लवकरच स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक स्वराज्य संस्था यांची सुद्धा अधिसूचना जाहीर झाली होती, ती सुद्धा लवकरात लवकर लागू करण्यात येईल असे स्पष्ट सांगण्यात आले. आजच्या बैठकीला मां . कामगार उपसचिव, मां. कामगार आयुक्त, मां.उपायुक्त तसेच महानिर्मितीचे कार्यकारी संचालक डॉ. नितीन वाघ, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी वार्जुरकर, महावितरण चे औद्योगिक संबंध अधिकारी श्री ढोके आणि महापारेषण चे औद्योगिक संबंध अधिकारी श्री भगत पाटील उपस्थित होते.
 आजच्या बैठकीचे इतिवृत्त संघटनेला लवकरात लवकर देण्याचे निर्देश सूध्दा दिले.
या बैठकीमध्ये स्वाभिमानी महानिर्मिती कृती समितीचे संयोजक तथा मार्गदर्शक कॉम्रेड नचिकेत मोरे, उपाध्यक्ष तथा रोजंदारी मजदुर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर, रोशन गोस्वामी, राहुल ‌ नागदिवे, केतन लांजेवार युवराज मैदं, मनोहर अवचार, नितेश तायडे, रंजीत तायडे सुनील मोडवे उपस्थित होते अशी माहिती संयुक्त कृती समिती चे उपाध्यक्ष तथा रोजंदारी मजदुर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी