आंबा-काजू शेती 'नैसर्गिक आपत्ती' जाहीर करा- शेतकरी राजा सामाजिक समीतीची मागणी
बीड प्रतिनिधी : सद्यस्थितीत बदलत्या हवामानामुळे सध्या राज्यातील आंबा-काजू हवामान बदलामुळे सुमारे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकरी वर्गावर हे ओढलेले पून्हा: एक नवं संकट आहे. या गंभीर समस्येला पाहता सरकारणे याला 'नैसर्गिक आपत्ती' जाहीर करून हेक्टरी ५ लाखांपर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी शेतकरी राजा सामाजिक समीतीचे अध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी केली आहे.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस, दाट धुके आणि दव यामुळे आंबा व काजू बागांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणीतर काजू, आंब्याचा मोहर जळून गेला असून, काही भागांत फळांवर काळे डाग पडल्याने ती निकामी झाली आहेत. काजू बागायतदारांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर ईतर ठीकाणी सुद्धा आंबा पिक देखील अडचणीच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी आता पुर्णपणे कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर येवुन ठेपला आहे. यामुळे शेतकरी राजा उपाशी आणि ईतरत्र तुपाशी हे कधीही आम्हाला मान्य होणार नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगलाच पाहिजे यासाठी आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे शेतकरी राजा सामाजिक समितीचे अध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी बोलताना सांगितले.
शेतकरी राजा सामाजिक समीतीने राज्यातील आंबा - काजु धारक शेतकऱ्यांच्या पिकांची दयनिय अवस्था असल्याबाबत यावर मोठी चिंता व्यक्त केली. राज्यातील शेतकरी पहिल्याच मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे अडचणीत सापडला होता ती दैना कमी होण्याचे नाव घेत नाही तोच, आता आंबा- काजू पीकधारक शेतकरी या बदलत्या हवामानामुळे पुन्हा एकदा नव संकटात सापडला असल्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात – आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रुपये, काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी राजा सामाजिक समीती अध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी प्रसार माध्यमा द्वारे केली आहे.
Comments
Post a Comment