छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर लिंबागणेश येथे उत्साहात संपन्न
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर लिंबागणेश येथे उत्साहात संपन्न
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप
लिंबागणेश (दि.११ मार्च): राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा–१) अंतर्गत लिंबागणेश येथे आज दि.११ बुधवार रोजी आयोजित करण्यात आलेले महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती देवस्थान सभामंडपात आयोजित या शिबिरात शेतकरी, ग्रामस्थ, महिला बचत गट, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेतला.
या अभियानाचे आयोजन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास राजेंद्र मस्के, बळीराम गवते, डॉ. गणेश ढवळे, गोरखनाथ सिंगर यांच्यासह महसूल विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये निवासी नायब तहसीलदार सुहास हजारे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, निवडणूक नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, नायब तहसीलदार अण्णासाहेब वंजारे, पुरवठा निरीक्षक प्रशांत सुपेकर, उपाधीक्षक भूमी अभिलेख अनिल शिवणकर, आरोग्य निरीक्षक अशोक लोखंडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
लिंबागणेश महसूल मंडळातील २२ गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, माजी लोकप्रतिनिधी तसेच महिला बचत गट, शेतकरी गट आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले.
विविध सेवांचा लाभ
शिबिरात महसूल विभागाशी संबंधित जमीन नोंदी, खातेफोड, वारस नोंद, सातबारा उतारे, विविध दाखले व प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते.
शिबिरात खालील सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला:
जिवंत सातबारा (मयत खातेदार कमी करणे)
डिजिटल सातबारा वाटप
वारस फेरफार
वर्ग–१ ते वर्ग–२ रूपांतर
ई-पिक पाहणी
ॲग्रीस्टॅक नोंदणी
ई-वसुली पावती
सेवामित्र प्रमाणपत्र
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
पानंद रस्ते योजना
ई-केवायसी व आधार कॅम्प
ई-शिधापत्रिका वाटप
लक्ष्मी मुक्ती योजना
मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
घरकुल मंजुरी आदेश, गायरान मंजुरी आदेश
मागेल त्याला शेततळे योजना
मोठ्या प्रमाणावर सेवा वितरण
या शिबिरामध्ये
२७६० डिजिटल सातबारा उतारे वाटप
२१० डिजिटल शिधापत्रिका वितरण
महसूल विभागाशी संबंधित ६० फेरफार प्रकरणांचा निपटारा
२७२ विविध प्रमाणपत्रांचे वितरण
१३४ मोफत बस पास वाटप
१८१ आयुष्यमान भारत कार्ड वितरण
२२२ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
तहसीलदारांचे मार्गदर्शन
यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले की, शासनाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे अभियान सुरू केले असून प्रशासनाकडून नागरिकांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यात येईल. कोणताही नागरिक आपल्या समस्येसाठी थेट संपर्क साधू शकतो, असे त्यांनी सांगितले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी पंडित नायकवाडे तसेच ग्राम महसूल अधिकारी गणपत पोतदार, शिवराम येवले, शेख गफूर, नारायण दराडे, प्रमोद कोळपकर, अश्विनी डोळस तसेच महसूल सेवक बाबासाहेब बिरलिंगे आणि ललित काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रशासनाचा समन्वय आणि विविध सेवांचे तातडीने वितरण यामुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
Comments
Post a Comment