रयत सामाजिक प्रतिष्ठानचा १६वा पुरस्कार वितरण सोहळा २०२६ दिमाखात संपन्न

रयत सामाजिक प्रतिष्ठानचा १६वा पुरस्कार वितरण सोहळा २०२६ दिमाखात संपन्न

सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; प्रेरणादायी सोहळा
बीड | प्रतिनिधी

सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रयत सामाजिक प्रतिष्ठानचा १६वा पुरस्कार वितरण सोहळा २०२६ बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अत्यंत भव्य आणि दिमाखदार वातावरणात उत्साहात पार पडला. यशवंतराव चव्हाण सभागृहात उपस्थित मान्यवर, कलाकार आणि नागरिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सन्मानितांचा गौरव करण्यात आला.

हा सोहळा प्रतिष्ठानच्या रोहिणीताई गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आयोजन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलोचना माने व शुभांगी माने यांनी केले होते. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते प्रमुख उपस्थिती राजेश दादा खर्डे (वेसावकर) यांची पारंपरिक कोळी वेशातील दमदार एन्ट्री. त्यांच्या आगमनाने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी प्रतिष्ठान अध्यक्षा द्रौपताबाई पठारे, ज्येष्ठ समाजसेवक कैलास दादा पठारे, विठ्ठल मूर्तीवार, मंजू ताई पठारे, अक्षय कलाकार, बंडोपंत सोळुंके, चित्रपट मंडळाचे प्रशांत होर्शीळ सर, समाजसेवक सुशीलजी खटोड, एम.एस. कन्स्ट्रक्शनचे संचालक साथीराम अण्णा ढोले, ओबीसी फाउंडेशनचे लक्ष्मण लटपटे, संतोष अवताडे (अहिल्यानगर) तसेच सोशल मीडियावर लोकप्रिय इंस्टाग्राम रील स्टार लखन चव्हाण, ओम पावले, खंडू तात्या आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानितांमध्ये प्रमोद रामदासी, लक्ष्मीकांत रुईकर, आदिम राज बहुउद्देशीय संस्था (रामू मोते), सुशील हरिभाऊ कोळेकर, पसायदान सेवा केंद्रचे गोवर्धन दराडे, सरोज आनंदकर (नागपूर), संगीता माने (क्राईम ब्रँच, मुंबई), प्रमोद गोरक्षनाथ चांदणे, प्राची चांदणी, देविदास उत्तम शेलार आणि नयना रतन कानडे यांचा समावेश होता. सन्मान स्वीकारताना मान्यवरांनी आपल्या कार्याचा अनुभव मांडत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी केले. प्रतिष्ठानचे सदस्य गणेश माने, किशोर कुलकर्णी, प्रकाश देवा, जाकीर भाई, विकास धोत्रे, गुड्ड्या जोगदंड, महादेव सवाई, मीनाक्षी देवकते, नयना भाकरे, नेहा साबळे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक जबाबदाऱ्या सांभाळून कार्यक्रम यशस्वी केला.

भव्य-दिव्य वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाली असून, समाजकार्याची नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी