हार्वेस्टरने गहू काढण्याकडे लिंबागणेश येथील शेतकऱ्यांचा वाढता कलमजुरांऐवजी यंत्रसामग्री परवडत; वेळ, श्रम व पैशांची बचत
हार्वेस्टरने गहू काढण्याकडे लिंबागणेश येथील शेतकऱ्यांचा वाढता कल
मजुरांऐवजी यंत्रसामग्री परवडत; वेळ, श्रम व पैशांची बचत
लिंबागणेश (दि.१४) – गव्हाच्या पिकाची कापणी व मळणी करण्यासाठी मजुरांऐवजी हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र लिंबागणेश परिसरात दिसून येत आहे. यंत्राद्वारे काढणी केल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होत असल्याने शेतकरी यांत्रिकीकरणाला पसंती देत असल्याची प्रतिक्रिया येथील शेतकरी गणपत तागड यांनी व्यक्त केली.
बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात सध्या रब्बी पिकांच्या कापणी-मळणीची लगबग सुरू आहे. गत काही वर्षांपासून गव्हाची काढणी हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने करण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतीकामासाठी मजुरांची टंचाई तसेच वाढलेले मजुरीदर यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने कापणी करणे कठीण होत आहे.
मजुरांच्या मदतीने गव्हाची कापणी, बांधणी आणि मळणी करण्यासाठी साधारणतः ४ ते ५ दिवस लागतात व त्यासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मात्र हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने हेच काम अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होत असून प्रति एकर सुमारे ३००० रुपयांत काढणी होते. त्यामुळे वेळ आणि पैशांची मोठी बचत होत असल्याने शेतकरी हार्वेस्टर मशीनचा वापर अधिक प्रमाणात करू लागल्याचे शेतकरी गणपत तागड यांनी सांगितले.
Comments
Post a Comment