क्रांतीज्योती सावित्रीमाई स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
क्रांतीज्योती सावित्रीमाई स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
( निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्याचा सत्कार, महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल वाचनालयाचा उपक्रम )
बीड (प्रतिनिधी) - अनिष्ट रूढी परंपरा, कर्मकांड यांच्या जोखंडात आडकऊन सर्व स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे स्त्रियांची शुद्र, अति -शुद्राची जी अधोगती विद्ये अभावी झाली होती ती दूर करण्याकरिता वंचित, शूद्र अतिशूद्र व मुलींकरता शिक्षणाचे दारे उघडून भिडे वाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ह्या आपल्या समस्ता स्त्रियांच्या, वंचितांच्या ज्ञानज्योती आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून तसे आचरण आपल्या जीवनात ठेऊन, फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारघारेनुसार संविधानिक मार्गाने स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय स्थापन होण्यास वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अनमोल सहकार्य लाभेल असे प्रतिपादन प्रा. बबीता गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या 129 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन प्रसंगी केले.
महामानव अभिवादन ग्रुप संचलित मोफत शिकवणी वर्ग प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या " सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान मातृत्वाचा " आणि महापुरुषाच्या जीवनावरील निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.सुशीलकुमार गायकवाड लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बबिता गायकवाड, मुख्याध्यापिका वैशाली शिंदे-उजगरे व समता सैनिकदलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले यांची उपस्थिती होती. विचार मंचावर महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, वाचाल तर वाचाल फिरते मोबत वाचनालयाचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे, ज्येष्ठ सदस्य एस. एस. सोनवणे, बी.जी. दळवी, डॉ.जगदीश वाघमारे, के.एस.वाघमारे यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम आदर्शांच्या प्रतिमेचे पुष्प,दीप,धुपाने मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निबंध स्पर्धेतील उत्कृष्ट निबंधाचे लेखन केलेल्या निबंधांचे वाचन अश्विनी माने व अमृता चौगुले या विद्यार्थ्यांनी केले. त्याबद्दल अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे कौतुक करून स्पर्धेतील एकूण 8 विद्यार्थी, विद्यार्थिनींना शालेय साहित्य ( वही पेन) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, माता रमाई, यांच्या जीवनचरित्राची पुस्तके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. पुढील यशा करिता मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. मासिक घटक चाचणीतील प्राथमिक व माध्यमिक गटातील 8 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ( वही पेन ) वाटप करून अभ्यासातील सातत्याकरिता प्रोत्साहन दिले. आद्य शिक्षिका सावित्रीमाईने अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजातिल वंचितांच हीत कारक कार्य केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोफत शिकवणी वर्गाच्या कर्तबगार वर्गशिक्षिका विशाखा वाघमारे अविरतपणे विद्यार्थ्यांच्या प्रगती करिता कष्ट करत आहेत तर अत्यंत गरिबीची परिस्थिती असतानाही आशा जाधव या मातेने गरिबी शिक्षणाच्या आड न येऊ देता आपला मुलगा प्रशिक जाधवला पुण्याला उच्च शिक्षणासाठी पाठवले व नंतर एल.एल.बी.शिक्षणाकरिता प्रोत्साहन केले. तसेच मुलगी रसिकाला शिक्षीका होण्याकरिता डि.एड.चे शिक्षण देत आहेत व पुढे मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय प्राप्त करण्याकरिता शिक्षणाच्या प्रवाहात राहण्याकरिता सातत्याने प्रयत्नशील आहेत. अशा दोन मातांचा वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालया तर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मान कर्तुत्वाचा, सन्मान मातृत्व चा म्हणून माता रमाईच जिवण चरित्र व सावित्रीबाई लिखित " काव्य फुले " हा काव्यसंग्रह पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी वैशाली शिंदे यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य गायकवाड यांनी वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले व पुढील भेटीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वाचाल तर वाचाल वाचनालयाला 50 पुस्तके भेट देण्याचे जाहीर केले व मुलांना व पालकांना उच्च शिक्षणाचे महत्त्व, बालपणी चे संस्कार महापुरुषाच्या जीवनाचे वाचन व तसे आचरण ठेवणे कसे महत्त्वाचे आहे हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले तर वंदना वाघमारे यांनी आभार मानले, डॉ.जगदीश वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वीते करता बहुमोल सहकार्य व परिश्रम केले. कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी, महिला, पालक, बालक, बालिका, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरणातयने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment