जागतिक महिला दिनानिमित्त रयत सामाजिक प्रतिष्ठानकडून महिलांचा सन्मान



बीड | प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत 7 मार्च रोजी रात्री 12 वाजल्यापासून 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी ज्या मातांना कन्यारत्न प्राप्त होईल, अशा महिलांचा साडी-चोळी देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

यासोबतच शहरातील गरजवंत महिलांचाही साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या सल्लागार संगीताताई धसे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन रोहिणीताई गणेश माने यांच्या पुढाकाराने होत असून, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुलोचना माने, शुभांगी माने यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित राहणार आहेत.

महिला सशक्तीकरणाचा संदेश देत समाजात मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि महिलांना सन्मान मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी