एक वेळ भजन किर्तन ऐकू नका,महात्मा फुलेंचे 'शेतक-याचा आसुड','गुलामगिरी'हे ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचा-ह.भ.प.नितीन महाराज पिसाळ.



बीड दि (11): निरगुडी ता.पाटोदा येथे 'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने आयोजित प्रबोधनपर किर्तनासाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या "विष्णुमय जग,वैष्णवांचा धर्म ,भेदाभेद भ्रम,अमंगळ!" या अभंगाचे निरूपण करताना, भेदाभेदरहित- सामाजिक सलोखा,बंधूभाव,समता,
स्वातंत्र्य ही मुल्ये अधोरेखित करताना वारकरी संप्रदाय व या परंपरेत पुढे विशेषत: शेतकरी वर्गाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज यांचे विचार,त्यानुषंगाने 
जीवनभर अथक केलेले कार्य,लक्षात घेण्यासाठी त्यांचे साहित्य पुन्हा पुन्हा वाचावे. एक वेळ भजन किर्तन ऐकले नाही तरी चालेल ;परंतु महात्मा फुले यांचे 'शेतक-यांचा आसुड' 'गुलामगिरी',डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे 'जातींचे निर्मूलन','शूद्र कोण होते?', 'स्त्रीवादी आंबेडकरवाद' कॉ गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता?' प्रबोधनकार ठाकरे यांचे 'लोकहितवादी दीनोद्धारक कर्मयोगी संत गाडगे बाबा' संत कबीर,हे व असे सामाजिक एकता,एकात्मता, न्याय ,धार्मिक सद्भावना,सहिष्णुता असे अत्यावश्यक मुल्ये ऐतिहासिक पुराव्यासहीत मांडणारे ग्रंथ वाचायलाच हवेत.असे स्पष्ट प्रतिपादन प्रबोधनकार किर्तनकार ह.भ.प.नितीन महाराज पिसाळ यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभा,बीड जिल्ह्याचे अध्यक्ष व किर्तनाचे संयोजक प्राचार्य कॉ डी जी तांदळे यांनी दिली आहे.
या संबंधी अधिक वृतांत असा की,निरगुडी हे गाव अठरा पगड जातीचे असून,ही तांदळे सरांची शिक्षकी पेशातील 80 च्या दशकातील आरन्भिक कर्मभूमी असल्याने,त्यांनी प्रथमच येथे ग्रामस्थां साठी,विशेषत्वाने महिलांसाठी ,'जागतिक महिला दिन 'निमित्ताने किर्तन व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान,असे संयोजन माजी विद्यार्थी ,सरपंच,नेते, सामाजिक कार्यकर्ते, सहकारी,व मित्रांचे मदतीने केले.

नितीन महाराजांनी
 'भेदाभेद भ्रम, अमंगळ!' अधिक स्पष्ट करताना कोणाही "जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वश्वर पूजनाचे" हे देखिल जाणीवपुर्वक आग्रहाने स्पष्ट केले. 'वास्तव' वारकरी संप्रदायात द्वेष ,मत्सर,अन्याय,अत्याचार हिंसेला अजिबात जागा नाही: हे परखडपणे दृष्टांतासह सांगितले. जातिभेद,धर्मभेद ,बालविवाह,
स्त्रीभ्रूण हत्या,पुरोहितशाही ,कर्मकांड,
दैववाद,पोथीनिष्ठा,परंपरानिष्ठा, अंधश्रद्धा ,हे सामाजिक दुर्धर रोग अजुनही कायम आहेत. "नाचू किर्तनाचे रंगी,ज्ञान दीप लावू जगी" ".....सर्वाभुती वासुदेव...." या प्रमाणे संतवचने,विद्रोह,उपदेशपर अभंग ,व महामानवांचे विचार- जीवन कार्य हे दिपस्तंभ,यांचे दाखले देत,या सामाजिक रोगांचे उच्चाटन वैज्ञानिक दृष्टिकोनातून करायचे,हे सांगितले.
महाराजांना मृदंगाचार्य प्रवीण महाराज,प्रभावी सुरेल गायक दादा महाराज, गणेश बेदरे महाराज,शेलार महाराज व सहकारी ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली.  

या प्रसंगी अंगणवाडी सेविका विजया सुतार,वैशाली बेदरे,आशा वर्कर चंद्रकला सानप,
मदतनिस अनिता कदम,से नि मु अ वृंदा सुस्कर,व सविता बेदरे यांना पुस्तके,शाल ,बुके देवून नितीन महाराजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास अर्चना दोडके,दिपाली सानप,शोभा बेदरे,मनिषा घुमरे,सुनंदा घुमरे,उषा सुस्कर,संगीता तावरे,
प्रगती बेद्रे, सोजरबाई सवासे, अनुसया तांदळे,ज्योती सवासे,सावंत काकू,पार्वती बेदरे या प्रमुख महिलांसह शेकडोंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन प्रशासक सरपंच अशोक सानप,से नि अधिकारी राहूल शिंदे, बळीराम सानप, भाऊसाहेब शिंदे,शेख अख्तर,से नि प्रा विठ्ठल सवासे, 
शिवशंकर घुमरे,अर्जून शेलार,संतोष शेलार लेक लाडकी अभियानचे समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी यशस्वीरित्या केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल शिंदे,संचलन सरपंच अशोक सानप यांनी व सर्वांचे आभार डी जी तांदळे यानी मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी