महसूल विभागाची ढिलाई; पाटोद्यातील ६६ शेतकरी ‘पीएम किसान’पासून वंचित शेतकऱ्यांचा संताप


पाटोदा (प्रतिनिधी ) लँड सीडिंग प्रक्रियेत गंभीर निष्काळजीपणा व जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या महसूल विभागाच्या कारभारामुळे पाटोदा तालुक्यातील तब्बल ६६ शेतकरी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ७/१२ उताऱ्यांतील नोंदी अद्ययावत करण्यास टाळाटाळ, तांत्रिक कारणांची आड घेऊन कामे प्रलंबित ठेवणे, तसेच जबाबदारी झटकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.दरम्यान, महसूल व कृषी विभागांच्या ढकलाढकलीत शेतकरी भरडले जात आहेत. शेतकऱ्यांननी तहसिल व कृषी “कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यामुळे पात्र असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम किसान’चा हप्ता जमा होत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत तात्काळ लँड सीडिंग प्रक्रिया पूर्ण करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी