मानेवाडी येथे महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन उत्साहात साजरा
(चौसाळा प्रतिनिधी) बीड तालुक्यातील मानेवाडी येथे महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रम हा राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने मानेवाडी येथे भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वीतरणाचे वाटप ही झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सरलाताई कामराज मुळे पाटील यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली व आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.सदरील कार्यक्रमाचे
प्रस्तावित/सूत्रसंचालन दिगंबर तात्या आवारे यांनी केले.या भाषण स्पर्धेत
दिव्या बा.आवारे, कोमल म.मोरे, दूर्वा दी.गाडगे, काव्य वि.मोरे,यांनी प्रथम,द्वितीय,तृतीय,चौथा क्रमांक मिळवला कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरलाताई मुळे पाटील , मुक्ताताई शिंदे, राणी ता.गाडवे, duche मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले या स्पर्धेत माँ साहेब जिजाऊ,सावित्रीबाई फुले,छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले व अनेक विद्यार्थिनींनी या भाषण स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी डॉ. सुबोध ना.माने व ज्ञानेश्वर सु.माने यांनी महिला दिनावर आपले विचार मांडले युवा उद्योजक लक्ष्मण म.शिंदे मंत्री लीलन हाऊस पुणे यांच्या वतीने सर्व बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मानेवाडी येथील ग्रामस्थ व संस्थेच्या सभासदांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी अविनाश माने यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Comments
Post a Comment