जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे . त्या निमिताने गढी ग्रामपंचायतचे जलसुरक्षक सखाराम पोहिकर यांचा सत्कार
जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे . त्या निमिताने गढी ग्रामपंचायतचे जलसुरक्षक सखाराम पोहिकर यांचा सत्कार
गेवराई तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाने जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे त्या निमित्ताने गढी ग्रामपंचायतच्यावतीने गढी ग्रामपंचायत चे जल सुरक्षक व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष कॉमेड सखाराम पोहिकर यांचा आज सकाळी १० = ०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय गढी समोर आदर सत्कार करण्यात आला . यावेळी स्वच्छ आणि सुरक्षिक पाणी प्रत्येक घरापर्यत पोहोचवण्याचे काम गढी ग्रामपंचायत चे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांचा आज गढी ग्रामपंचायतचे सरपंच श्री विष्णूपंत घोगडे व गढी गावचे जेष्ठ नागरिक श्री . भागवत ( भाऊ ) नाकाडे . शेख नुर टेलर . श्री मिठू ( काका) नाकाडे . मा रविंद्र ( बप्पा ) सिरसट . या सर्वानी आज गढी ग्रामपंचायत कार्यालयासमोर . शाल . पुष्पहार देउन आदर सत्कार करण्यात आला .
यावेळी गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोगंडे . आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की गढी गावाला गेल्या अनेक वर्षापासून अहोरात्र मेहनत घेउन स्वच्छ पाणी देण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत .
त्यांच्या कामाचा आदर सन्मान करण हे आपल कर्तव्य आहे .
म्हणून आज गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांचा शाल पुष्पहार देउन सन्मान करण्यात आला व सन्मान करण हे आमच कर्तव्य आहे . तेव्हा आज गढीचे जेष्ठ नागरिक भागवत (भाऊ) नाकाडे . मिठ्ठू ( काका) नाकाडे . शेख नुर टेलर . रविद्र ( बप्पा) सिरसट यांच्या हास्ते शाल पुष्पहार.. देऊन सत्कार करताना आम्हाला खुप अभिमान वाटतो .
या सत्काराला उत्तर देताना श्री सखाराम पोहिकर असे म्हणाले की आज जो माझा सत्कार ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आला त्याबद्दल मी माझे भाग्य समझतो .व मी यापुढे ही आशीच सेवा माझ्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रर्थना करतो शेवटी आभार रविंद्र ( बप्पा ) सिरसट यांनी मानले व सत्काराचा कार्यक्रम संपला आसे जाहीर केले
Comments
Post a Comment